प्रचारादरम्यान अनुभवयास आला एक भावनिक प्रसंग
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी :- संतोष भंडारे (विटा)
विटा:- टीका – टिप्पणी, आरोप – प्रत्यारोप, अशा गदारोळात सध्या सर्वत्र प्रचाराचा धुरळा उडाला असताना खानापूर मतदारसंघात मात्र प्रचारात एकप्रकारचे भावनिक वातावरण पहावयास मिळत आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर यांना एका अशा प्रसंगाला सामोरे जावे लागले की अक्षरशा सुहास बाबर भारावून गेले. विसापुर सर्कल विजयनगर येथिल मधिल आराध्या शशिकांत बोराडे या चिमुकलीने स्वतःचे खाऊचे साठवलेले पैसे (पीगी बँक), सुहास भैय्यांच्या हातावर ठेवले. मिळालेल्या या अनमोल भेटीमुळे सुहासभैया निशब्द झाले.
महायुतीचे अधीकृत उमेदवार सुहास बाबर यांना या निवडणुकीत अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. तरुण ,जेष्ठ , महिला वर्गातून तर सुहास भैयांना सहकार्य मिळतच आहेच शिवाय काही ठिकाणी माता-भगिनींच्याकडून निवडणुकीसाठी पैसे दिले जात आहेत. आज तासगाव तालुक्यातील विजयनगर येथे चिमुकलीने खाऊचे पैसे देऊन सुहास भैयांना भावनिक केले. वर्षभर आई-बाबांनी आणि थोरामोठ्यांनी खाऊ साठी दिलेले पैसे आराध्या बोराडे या चिमुकलीने साठवून ठेवले होते. लहानगी मंडळी साठवलेले पैसे त्यांच्या आवडत्या क्षणीच बाहेर काढतात. आराध्याने मात्र सुहासभैया प्रचारासाठी घरी येताच आपला पैशाचा साठवलेला डबा बाहेर काढला आणि ती सगळी रक्कम सुहास भैयांच्या हाती सुपुर्द केली.
आराध्याने दिलेले खाऊचे पैसे घेण्यास सुहास भैय्यानी नकार दिला. त्यावेळी तिच्या बाबांनी तुम्ही आज गावात येणार आहात हे समजताच तिने रात्रीपासून खाऊचा डब्यामध्ये साठवलेले पैसे तुम्हाला देणार अस सांगत होती. हे पैसे नाही तिच्या भावना आहेत कृपया स्वीकार करा असे सांगताच सुहासभैया भारावले. सुहासभैया बोलताना यावेळेस म्हणाले, ही निवडणूक खरोखरच माझ्या आयुष्यातली सर्वात भावनिक आहे. लोकांचे प्रचंड प्रेम मिळत आहे. चिमुकलीने किती रक्कम दिली यापेक्षा माझ्यासाठी ही रक्कम आयुष्यातील अनमोल ठेवा असेल.