DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा
साक्री:- धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील आदर्श गाव शेवाळी(दा.) येथे ग्राम सुधार मंडळाचे वतीने दरवर्षी दिवाळी काळात वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात येते परंतु या वर्षी दिवाळी काळात आदर्श आचार संहिता लागू होती त्या कारणास्तव दि ३० नोव्हेंबर २०२४ शनिवारी रोजी कै.सौ.शांताताई आत्माराम साळुंके नाट्यगृह येथे वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत मंडळाचे सचिव सुरेश साळुंके यांनी वर्षभराचा आर्थिक लेखाजोखा गावकऱ्यांसमोर मांडला.
ग्राम सुधार मंडळाचे सदस्य प्रभाकर साळुंके यांनी गावात मागील काही दिवसांपूर्वी पावसाच्या पाण्याने धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने भद्रावती नदीचा प्रवाह वाढून पूर आल्याने नदीकाठी असलेल्या मारूती मंदिराचे काही प्रमाणात नुकसान झाले होते भविष्यात अशी स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीने याची तातडीने दखल घ्यावी व त्या ठिकाणी सुरक्षात्मक उपाय योजना राबवून कायमस्वरूपीचा तोडगा काढावा, आपल्या गावाचे ग्राम दैवताचे काम असल्यामुळे उत्कृष्ट दर्जाचे काम करावे अशा सूचना केल्या यावेळी सर्व ग्रामस्थांनी सहमती दर्शविली व तसेच गावकऱ्यांच्या वतीने विविध विषयांवर चर्चा विनिमय कऱण्यात आले.सूत्रसंचालन सचिव सुरेश साळुंके, आभार चेअरमन साहेबराव साळुंके, सभा यशस्वी साठी माजी चेअरमन अरुण साळुंके, अनुमोदन सदस्य रशीद शहा यांनी केले.
शेवाळी(दा.) गाव हे विविध परंपरा जपणारे आदर्श गाव म्हणून ओळखले जाते या गावात अनेक कलावंत होवून गेलेत तशीच एक परंपरा म्हणजे गावातील सामाजिक, राजकिय, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी व योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार गौरव करून गावकऱ्यांपुढे आदर्श व प्रेरणा निर्माण करण्याची परंपरा आज हि अविरत सुरू आहे.
ग्राम सुधार मंडळाच्या वतीने लोकमत ग्रेट लीगल माईंड या पुरस्काराचे सन्मानार्थी कायदे तज्ञ वकील मोहन साळुंके, वि.वि.का.से.सो. च्या चेअरमन पदी नियुक्ती झालेले माधवराव नांद्रे, भारत सरकार संचार मंत्रालय, महाराष्ट्र ग्रामीण डाक विमा व्यवसाय उत्कृष्ट कार्य प्रथम पुरस्कार प्राप्त अमोल साळुंके,महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जलसंपदा विभागात सहायक अभियंता पदी नियुक्ती झालेली कु. यशश्री भदाणे, धुळे जिल्हा परिषदतर्फे आदर्श प्रतिभावंत पुरस्कार प्राप्त जि.प.शाळेच्या शिक्षिका प्रतिभा साळुंके, सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता पदी नियुक्ती झालेली कु.तन्वी साळुंके, पत्रकारिता क्षेत्रात सामाजिक, राजकीय समस्या प्रशासनासमोर मांडून उल्लेखनीय कामगिरी करणारे पत्रकार अकिल शहा, पाणलोटाच्या प्राधान्यक्रमासाठी पांझरा नदी खात्याचे परिणात्मक आणि गुणात्मक विश्लेषण या विषयावर पीएचडी प्राप्त डॉ.केतन साळुंके, जलसंपदा सहायक अभियंता नाशिक जिल्हा कु.तेजस्विनी जाधव, नैसर्गिक मानव अधिकारी सुरक्षा परिषदेच्या वतीने शिक्षक पुरस्कार प्राप्त जि.प.शाळेचे शिक्षक सुरेंद्र नेरकर, जेष्ठ वारकरी अशोक तात्या साळुंके,व तसेच गावातील मुस्लीम समाज बांधवांच्या वतीने पवित्र धार्मिक स्थळ असणारे मक्का येथे उमराह करण्यासाठी गेलेले हाजी मुसा शहा व त्यांच्या पत्नी नुरबानो शहा,साबेराबी शहा, हाजी हाफिज शहा व त्यांच्या पत्नी शायना शहा आदींचा शाल,श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी ग्राम सुधार मंडळाचे चेअरमन साहेबराव साळुंके, सचिव सुरेश साळुंके,सदस्य भालेराव साळुंके, अशोक भदाणे, रमेश साळुंके, प्रभाकर साळुंके, निंबा साळुंके, रावसाहेब वाघ, रशीद शहा, अरुण माळचे, उपसरपंच केतन साळुंके, माजी सरपंच दगाजी साळूंके, शेतकी संघ साक्रीचे व्हा. चेअरमन प्रदिप नांद्रे, उखाजी साळूंके, पत्रकार दिलीप साळुंके, शशिकांत साळुंके,राजू(माऊली) साळूंके, दत्तात्रय साळुंके, प्रभाकर जाधव, जि.प.केंद्र शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षीका व ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.