DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा
साक्री:- विद्युत वितरण कंपनी महावितरणने विज चोरी व वसूलीवर अधिक भर दिला आहे याशिवाय विज चोरी करणाऱ्या विरूध्द कारवाई सुरु केली आहे.
साक्री तालुक्यातील अक्कलपाडा व चिंचखेडे गावात शेवाळी शाखेचे अभियंता विश्वजित महाले , भामरे, प्रधान तंत्रज्ञ राजपूत, वरिष्ठ तंत्रज्ञ प्रकाश अहिरे, किशोर मोहिते, जितू देवरे यांचे पथक तपासणी साठी गेले असता ९ ते १० विज ग्राहक वीज चोरी करीत असल्याचे उघडकीस आले त्यांच्याविरूध्द कलम १३५ नुसार कारवाई कऱण्यात आली व लवकरच त्यांच्याकडून दंड ही वसूल करण्यात येणार आहे.
कलम १३५ मध्ये मीटरची छेडछाड करणे, आकडा टाकून विजेचा वापर करणे, सव्हिसवायर टॅप करणे व कलम १३८ मध्ये महावितरणचे मिटर, वायरसह इतर वस्तु चोरी करणे इत्यादी बाबींचा समावेश होतो. वीज चोरी पकडण्याची मोहीम यापुढेही चालू राहणार आहे.
अनधिकृत विजेचा वापर करू नये. अनधिकृतपणे विजेचा वापर करतांना आढळून आल्यास विद्युत कायद्यानुसार कडक कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. वीज ग्राहकांनी अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, ज्या ग्राहकांविरूध्द कारवाई करण्यात आली त्यांनी लवकर दंड भरावे अन्यथा कलम १३५ नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असे आवाहन महावितरणने केले आहे.