DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- साईनाथ खंडेराय
नांदेड:- नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वत्र तालुक्यामध्ये गोमास विक्री जोरात चालू असताना महाराष्ट्र सरकारने देसी गाईंना राजमाता घोषित केल्यानंतर गाईंचे जीव जाण्यापासून वाचवण्यासाठी गोरक्षक टीमने पोलिसांच्या सहकार्याने कामगिरी करत असताना जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी गोरक्षकांवर कसायाकडून हल्ला करण्यात आलेला आहे तर काही दिवसांपूर्वी हिमायतनगर तालुक्यामध्ये निवडणूक काळामध्ये एस एस टी पॉइंट वरती पोलीस कर्मचाऱ्यांनी बुलेरो टेम्पो रोकण्याचे प्रयत्न करत असताना बुलेरो टेम्पो ने बॅरिकेट सहित पोलीस कर्मचाऱ्याला सुद्धा उडवले होते
ह्या गोष्टीनंतर देगलूर मध्ये एका गोरक्षकावर हल्ला करून जेवे मारण्याची धमकी देण्यात आली.
देगलूर येथील एका गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्याला शनिवारी तिघांनी बाजारात मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तिघांवर देगलूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बागनटाकळी येथील प्रशांत बिचेवार यांचे रामपूर रोडवर ऑनलाइन सेतू सेंटर असून ते गोरक्षक दलाचे कार्यकर्ते आहेत. बिचेवार शनिवारी बागनटाकळी गावातून मित्रासोबत मोटारसायकलवरून देगलूरला येत होते. यावेळी त्यांच्या मागे मोटारसायकलवरून आलेल्या
तिघांनी बिचेवार यांना रस्त्यात अडवले. ‘बाजारात घेतलेल्या गाईचे फोटो का काढले’ असे म्हणत काठी व लाथा बुक्क्याने बेल्टने जबर मारहाण केली. यामध्ये बिचेवार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांनी देगलूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून वाशिम कुरेशी, शफीक कुरेशी व सद्दाम कुरेशी (सर्व रा. देगलूर) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नरहरी फड करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे तणावाची परिस्थिती नियंत्रणात आली आहे असेच प्रकरण जर जिल्ह्यामध्ये होत असेल तर शेतकऱ्यांमध्ये व गोरक्षकावर होत असलेले हल्ले रोखले जातील का? कत्तलखाने बंद पडतील का? अशी जनतेमध्ये चर्चा चालू असल्याचे दिसून येत आहे.