DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- संजय दिंडे
कोल्हापूर :- कोल्हापूर गांधी नगर मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक जाधव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. दिपक शंकर जाधव वय ४४ वर्षे सहा. पोलीस निरीक्षक, गांधीनगर पोलीस ठाणे, सध्या रा. अर्थव ओंकार कॉप्लेक्स बापट कॅम्प कोल्हापुर, गुळ रा. पेठकिनाई, ता. कोरेगांव, जिल्हा सातारा. आबासाहेब तुकाराम शिरगारे, पोलीस उप निरीक्षक सध्या रा. विठुमाउली अपार्टमेन्ट निगडेवाडी उचगांव, ता. करवीर जिल्हा कोल्हापुर मु. पो. उमरगा चिवरी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव उस्मानाबाद.
संतोष बळीराम कांबळे, वय ३३ वर्षे, पो. कॉ.ब.नं. १८२८, गांधीनगर पोलीस ठाणे, रा. शिरोली हौसिंग सोसायटी, गाळवाडी, शिरोली, ता. हातकणंगले जिल्हा कोल्हापुर यांनी लाच मागणी केली.
तक्रारदार व त्यांचा मित्र जनावरे वाहतुकीचा व्यवसाय करीत असुन तक्रारदार यांचेसह त्यांचे साथीदार यांचेवर गांधीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयात तक्रारदार यांचा आयशर टैम्पो जप्त आहे. तक्रारदार हे त्यांचा जप्त केलेला टैम्पो सोडविणेकरीता कोर्टात म्हणणे देणेकरीता गुन्हयाचे तपासी अधिकारी पोलीस उप निरीक्षक शिरगीरे यांना दिनांक २५/११/२०२४ रोजी भेटले असता त्यांनी तक्रारदार यांचेकडे म्हणणे देणेकरीता ३०,००० हजार रूपयांची मागणी केली. तसेच तक्रारदार यांचे पार्टनर यांनी गांधीनगर पोलीस ठाणे येथील सहायक पोलीस निरीक्षक दिपक जाधव यांनी फोन करून तक्रारदार यांना गुन्हयात मदत करतो यासाठी तक्रारदार यांचे मित्रायडे ३५,००० हजार रूपयांची मागणी केली होती म्हणुन तक्रारदार यांनी अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर येथे तक्रार दिली होती.याबाबत यातील तक्रारदार यांनी अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर येथे दिलेल्या तक्रार अर्जामध्ये पडताळणी केली असता त्यामध्ये तक्रारदार यांचेवर दाखल असलेल्या गुन्हयामध्ये मदत करणेसाठी व गुन्हयामध्ये जप्त असलेला टॅम्पो सोडविण्याकरीता मा. न्यायालयात म्हणणे देणेसाठी गुन्हयाचे तपासी अधिकारी पोलीस उप निरीक्षक शिरगिरे यांनी तक्रारदार यांना फोनवर पोलीस कर्मचारी कांबळे यांची भेट घेण्यास सांगितले त्याप्रमाणे तक्रारदार यांनी पोलीस कर्मचारी कांबळे यांची भेट घेतली असता पोलीस कर्मचारी कांबळे यांनी शिरगिरे साहेब यांना तक्रारदार यांचे समक्ष फोन केला व दुर्गेश आला आहे त्याला सांगितले का असे शिरगिरे साहेब यांना सांगितले असता त्यांच्यात बोलणे झाले नंतर पोलीस कांबळे यांनी शिरगिरे साहेब यांचे सांगणेवरून तक्रारदार यांचेकडे २०,००० हजार रू व त्यानंतर तडजोड करून १५००० हजार रूपये शिरगिरे साहेब यांचे करीता मागणी केली . तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक जाधव यांनी तक्रारदार हे अटकेत असताना सदर गुन्हयामध्ये मदत करणेकरीता तक्रारदार यांचे पार्टनर यांचेकडुन यापुर्वी पैसे घेतलेची कबुली देवुन गुन्हयात मदत करतो याकरीता उर्वरीत राहिलेले ३५००० हजार रूपयांची तक्रारदार व त्यांचे पार्टनर यांचेकडे मागणी केली तसेच गाडी सोडणेचे म्हणणे देणेकरीता शिरगिरे साहेबांना १०,००० रूपये दया असे म्हणुन शिरगिरे साहेबांचे करीता मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर कोल्हापूर जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उप अधीक्षीका वैष्णवी पाटील, बापू साळुंके, पोलीस निरीक्षक बापू साळुंखे व पथकाने कारवाई केली.