नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

साक्री शहरात २४ जानेवारी पासून शिवमहापुराण कथेला सुरुवात; लाखोंचा उसळणार जनसागर.

DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा

साक्री:  साक्री शहरात प्रथमच आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ता श्री पंडित प्रदीपजी मिश्रा यांचे शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची सुरूवात दि. २४ जानेवारी रोजी होणार असून तर समारोप ३० जानेवारी रोजी होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग ६ लगत असलेल्या फौजी पेट्रोल पंपा शेजारी कथेसाठी भव्य सभामंडप उभारण्यात आला आहे दुपारी १ ते ४  शिवमहापुरानची कथा पंडित प्रदीप मिश्रा यांच्या मुख वाणीतून होणार आहे, सुरतच्या कथेत पंडित मिश्राजी म्हणाले की, साक्रीकर भाग्यशाली असून या कथाकाळात माघ महिन्यातील सोमवार, शिवरात्री आणि प्रदोष हे एकत्र दिवस येत आहे असेही पंडित मिश्रा म्हणाले, सुमारे ३५० एकरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून वाहनधारकांसाठी पार्किंग ची व्यवस्था करण्यात आली आहे व तसेच आरोग्य यंत्रणा हि कऱण्यात आली आहे, भक्तांसाठी भोजनव्यवस्थेची सोय करण्यात आली आहे, अशा या भव्य दिव्य महापुरान कथेच्या कार्यक्रमासाठी साक्री तालुक्यासह राज्यभरातील भाविक भक्त तीन दिवसांपूर्वीच कार्यक्रमाच्या ठिकाणी हजेरी लावून दर्शनासाठी जागा सांभाळत आहेत. पोलीस प्रशासन ही सज्ज झाले आहे, कथेसाठी लाखो भाविक भक्त येण्याची शक्यता असल्याने त्या अनुषंगाने धुळे जिल्हा पोलिस दलातर्फे ३१ पोलीस अधिकारी २०० अमंलदार ३०० होमगार्ड असा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे अशी माहिती साक्री पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकार सहाय्यक पोलिस निरीक्षक जयेश खलाणे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना दिली. जास्तीत जास्त शिवभक्तांनी कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन ही यावेळी साक्री पिंपळनेर तालुका शिव महापुराण कथा समितीतर्फे करण्यात आले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:30 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!