नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

इचलकरंजी अप्पर तहसीलदार कार्यालयातील खाजगी उमेदवार हटवा – सामाजिक कार्यकर्ते तय्यब गडकर

कार्यालयामध्ये शिस्त लावावी अन्यथा आंदोलन करण्याचा निवेदनाद्वारे दिला इशारा


DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️✍️ प्रतिनिधी:- निवास गागडे

इचलकरंजी:- इचलकरंजी अप्पर तहसीलदार  कार्यालयातील अनेक अधिकारी / कर्मचारी कार्यालयामध्ये असताना नियमाप्रमाणे गळयामध्ये ओळखपत्र घालत नाहीत. अधिकारी कर्मचारी यांना आपल्या पदाची व जबाबदारीची पुर्णता जाणिव असतानाही कार्यालयीन कामाजाबाबत एकमेकाकडे बोट दाखवतात असे अनेक वेळा अनुभव आलेले आहे. त्याच बरोबर कार्यालयामध्ये नागरी सनद, माहीतीचा अधिकार अधिनियम २००५ या  कायदया अंतर्गत असलेल्या अर्जावर उक्त नियमांचे पालन करून विहीत कालावधीत कार्यवाही करण्यात येत नाही. तहसिलदार यांना भेटल्या शिवाय कामे होत नाहीत. शुल्लक कामासाठी सुद्धा आपली भेट घ्यावी लागत असते कार्यालयातील प्रत्येक अधिकारी कर्मचारी हे नव्याने काम करित असल्याचे व प्रशासकीय कामाचा अनुभव नसल्यासारखे त्याच प्रमाणे प्रशिक्षीत नसल्यासारखे वागताना दिसत आहेत. याकारणामुळे कार्यालयामध्ये आलेल्या अर्जावर वेळेत कार्यवाही होत नाही. नागरीकांच्या वेळेचे व पैशाचे नुकसान होत असुन कार्यालयामध्ये काही खाजगी उमेदवार हे संगणक, प्रिंटर टेबल, खुर्च्यांचा सर्रास वापर  करित आहेत- अधिकारी कर्मचारी हे खाजगी उमेदवार सांगतील तसे वागत असल्याचे निदर्शनास येत आहे संपुर्ण कार्यालयातील नागरीकांची महत्वाची कागदपत्रे ही खाजगी उमेदवार हाताळत असतात अशा पध्दतीने कार्यालयातील कामकाज चालु आहे आपल्या पुर्वीचे अप्पर तहसिलदार श्री शरद पाटील यांनी कार्यालयातील कामकाज शिस्तबध्द चालवून दाखविले आहे त्यांनी कार्यालयातील अधिकारी/ कर्मचारी यांना नागरी सनद प्रमाणे कामे करून घेत होते त्याच प्रमाणे सध्याचे अप्पर तहसीलदार यांनी सुध्दा शिस्तबध्द कामाची शिस्त लावावी.  नागरीकांची कामे तात्काळ व्हावीत, कार्यालयात कार्मचारी यांना ओळखपत्राची सक्ती करण्यात यावी व शासनाचे नियमांचे पालन व्हावे अन्यथा आंदोलन करणार असल्याचे इचलकरंजी शहरातील सामाजिक कार्यकर्ते तय्यब बशीर गडकर यांनी अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने यांना निवेदन दिले .  निवेदनाची दखल घेत इचलकरंजीचे अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने यांनी अप्पर तहसील कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या पुरवठा, संजय गांधी व अन्य विभागातील
कार्यालयीन कामकाजामध्ये पारदर्शकपणे व लोकाभिमुख होणेसाठी शासनाकडून वेळोवेळी प्राप्त झालेल्या सूचनाप्रमाणे कार्यालयीन कामकाज पार पडण्याच दृष्टी ने खालील प्रमाणे सुचना पारित करणेत आलेल्या आहेत.
१) सर्व अधिकारी कर्मचारी यानी आपले ओखपत्र दर्शनीभागात दिसेल असे गळयात घालावे
2) सर्व अधिकारी /कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित रहावे,
3) काही कारणास्तव कार्यालय सोडावयाचे असल्यास त्याची नोंद हालचाल रजिस्टर मध्ये  करावीत.
4) सर्व अधिकारी/कर्मचारी यांना नेमून दिलेल्या कार्यालयीन कामकाज वेळेत निर्गत करावीत दिलेल्या संकलनाबाबत परिपूर्ण अभ्यास करून प्रकरण पुर्ण करावीत.
5)पक्षकाराने चौकशीसाठी विचारलेली माहितं तात्काळ देणेत यावी
6)माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये आलेले अर्ज मुदतीत निर्गत करावेत.
कार्यालयामध्ये खाजगी उमेदवार यांचेकडून कार्यालयीन कामकाज होणार नाही याचे काटेकोरपणे पालन करणेत यावेत अशा लेखी सुचना कार्यालयीन परिपत्रकाने दिलेल्या आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:13 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
47 %
18 Km/h
Wind Gust: 33 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!