DPT NEWS NETWORK
दर्शन पोलीस टाइम
प्रतिनिधी:- डॉ. सुखदेव काटकर
भंडारा : लुटमार, चोऱ्या, दरोडे असे प्रकार नेहमी होत असतात त्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस अतोनात प्रयत्न करत असतात. पण भंडारा जिल्ह्यात चक्क पोलीस असल्याचे सांगत वृद्धाकडून 75 हजार रुपयाचे सोन्याचे दागिने लुटून नेले. ही घटना भंडारा शहरातील भैय्याजी नगर येथे घडली. बळीराम टीकाराम नागपुरे रा. बालाजीनगर खात रोड भंडारा यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नागपुरे हे त्यांच्या नावे घराचे बांधकाम होत असलेल्या घराची पाहणी करून परत येत असताना दोन भामट्यांनी त्यांना रस्त्यातच अडविले. तसेच आम्ही पोलिस कर्मचारी आहोत, असे सांगितले. सोन्याचा ऐवज असे नेऊ नका, ते कागदात गुंडाळून न्या, असे सांगून नागपुरे यांच्याकडील सोने कागदात गुंडाळून दिले. घरी येऊन कागद उघडले असता, त्यात ऐवज नसल्याचे आढळले.
पोलिस गणवेशात असल्याने नागपुरे यांना त्यांच्यावर विश्वास बसला. हे खरेखुरे पोलिस आहेत असे समजून त्यांच्याकडे सोन्याचा ऐवज दिला. येथेच त्यांची फसगत झाली. घरी आल्यावर खरा तो प्रकार उघडकीला आला.
फसवणूक झाल्याचे लक्षात येतात, त्यांनी भंडारा पोलिस ठाणे गाठले. तपास पोलिस उपनिरीक्षक नितनवरे करीत आहेत.