नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सि.गो.पाटील महाविद्यालयात व्याख्यान, शिवव्याख्याते प्रा. रुपेश पाटील

स्वराज्य निर्मितीच्या कार्यात अठरापगड जातीच्या लोकांनी सर्वस्वाने सामील होऊन हे राज्य आमचेच आहे ही भावना त्यांच्यात निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या कार्याला सर्वोत्कृष्ट मॅनेजमेंट म्हणता येईल: शिवव्याख्याते प्रा.रुपेश पाटील
DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा

साक्री :- साक्री शहरातील सि.गो.पाटील महाविद्यालयात १९ फेब्रुवारी बुधवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपस्थीत मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.स्वराज्य निर्मितीच्या कार्यात अठरापगड जातीच्या लोकांनी सर्वस्वाने सामील होऊन हे राज्य आमचेच आहे ही भावना त्यांच्यात निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या कार्याला सर्वोत्कृष्ट मॅनेजमेंट म्हणता येईल असे मत शिवव्याख्याते प्रा रुपेश युवराज पाटील यांनी व्यक्त केले.
विद्या विकास मंडळाचे सिताराम गोविंद पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, साक्री इतिहास विभागामार्फत शिवजन्मोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानाच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र अहिरे अध्यक्षस्थानी होते.प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य डॉ अनंत पाटील, माजी मराठी विभाग प्रमुख प्रा.एल.जी सोनवणे उपस्थित होते.इतिहास विभाग प्रमुख डॉ एन डी भामरे,राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ भूषण अहिरराव, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात जामखी पावरा प्रसंगी उपस्थित होते.
प्रा.रुपेश पाटील बोलतांना पुढे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज आपल्या प्रत्येक कार्यात शिस्तबद्ध नियोजनाला महत्त्व देत असत.कोणत्याही मावळ्याला मोहिमेत सामील करून घेताना त्याच्या अंगी असलेल्या कौशल्याचा वापर योग्य पद्धतीने ते करून घेत.श्रद्धा अंधश्रद्धेच्या पलीकडे जाऊन महाराजांनी अशुभ मानल्या गेलेल्या अमावस्येच्या रात्री मोहिमेची सुरुवात केल्याचे दिसून येते.अष्टप्रधान मंडळ, मोहिमेत गनिमी काव्याचा वापर,कठोर निर्णय प्रक्रिया आणि पद्धतशीर नियोजन इत्यादी गुणांचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासनात असल्याचे मत देखील त्यांनी प्रसंगी व्यक्त केले.सदर कार्यक्रमाची सुरुवात डॉ चंद्रकांत कढरे व चमूने गायलेल्या महाराष्ट्र गीताने झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ एन डी भामरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. ज्योती जाधव यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. भूषण अहिरराव यांनी केले.मेघा निकुंभ या विद्यार्थिनींनी शिवाजी महाराजांबद्दल मनोगत व्यक्त केले.सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी बांधव व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:50 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!