DPT NEWS NETWORK
प्रतिनिधी:- नारायण कांबळे
कोल्हापूर:- इचलकरंजी शहापूर मधील म्हाडा कॉलनीत नोकरीनिमित्त भाड्याने राहत असलेल्या एका कुटुंबातील 12 वर्षाच्या बालिकेवर त्यांच्या घरासमोर राहणाऱ्या विजय भागवत कुंडलकर वय 36, रा म्हाडा कॉलनी, शहापूर, मूळ गाव कोकलमोहा, बीड येथील पेशाने शिक्षक असलेल्या इसमाने दि 16 मार्च 2025 रोजी सकाळी 9 ते 10 या दरम्यान त्याच्या समोरील घरातील बालिका एकटी असल्याचा फायदा घेऊन, मागच्या दरवाजाने मुलीच्या घरात घुसून, तिला जबरदस्तीने उचलून, अंथरुणावर झोपवून तिच्या शरीराच्या छातीवरील व इतर अवयवावर अश्लील शारीरिक स्पर्श, लैंगिक छळ व बालिकेवर लिंग प्रवेशाचा अत्याचार करून आईला सांगू नको नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही अशी जीवे मारण्याची धमकी ही दिली असल्याची तक्रार पीडित बालिकेच्या आईने शहापूर पोलीस ठाणे येथे दिली आहे.
सदर शिक्षक इसमावर बी. एन.एस. कलम 64,65,75(1),351(2),(3),नुसार व लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण, अधिनियम 2012 चे कलम 4,8,12 प्रमाणे बालिकेवर लिंग प्रवेशाचा अत्याचार, लैंगिक आघात, अश्लील शारीरिक स्पर्शाद्वारे लैंगिक छळ या अंतर्गत शहापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.