DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 ✍️ ✍️ 🚨 ✍️ दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी साईनाथ खंडेराय
बिलोली येथे नव्या राष्ट्रीयकृत बँकेच्या स्थापनेसाठी खा.गोपछडे यांच्या मागणीला अर्थमंत्री सीतारामन यांचा सकारात्मक प्रतिसाद
बिलोली : महाराष्ट्र तेलंगनाच्या सीमेवर असलेल्या बिलोली तालुक्यातील वाढती लोकसंख्या पाहता व या तालुक्यास अनेक गांव खेडे जोडले गेले असल्यामुळे येथील शेतकरी, शेतमजूर,व्यापारी लोकांसाठी राष्ट्रीयकृत बँकेची अजुन एक नवी शाखा असायला हवी या हेतूने राज्यसभेचे खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन राष्ट्रीयकृत बँकेच्या नवीन शाखेची मागणी केली होती. या मागणीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे .
बिलोली तालुका हा तेलंगना महाराष्ट्र सीमेवर वसलेला तालुका आहे. या भागात शेतकरी , व्यापारी, नोकरदार मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु येथे केवळ एकच राष्ट्रीयकृत बँक अस्तित्वात आहे. तिथे संपूर्ण सुविधा नाहीत, यामुळे बँकेच्या देवाण घेवाणीला अनंत अडचणी येत आहेत. ही बाब लक्षात घेता या भागात राष्ट्रीयकृत बँकेची सर्व सुविधा युक्त बैंक ऑफ इंडिया ची नवीन शाखा स्थापन करण्यात यावी, यासाठी या भागाचे भूमिपुत्र खा. डॉ . अजित गोपछडे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये बिलोली येथे एक नवीन राष्ट्रीयकृत बँकेची सोय उपलब्ध झाल्यास या परिसरातील अनेक व्यापारी, शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिकांचा वेळ वाचेल व सर्वसामान्य थेट बँकेशी जोडले जाऊन आर्थिक प्रगतीच्या मुख्य प्रवाहात येण्यास मदत होईल, तसेच एकाच बँकेवरील ताण कमी होउन सर्वसामान्यांची गैरसोय कमी होईल. राष्ट्रीयकृत बँकेमुळे नवउद्योजक तरुणांना विविध व्यवसायासाठी लागणारे कर्ज मिळण्यास सुलभता निर्माण होऊन उद्योगास व रोजगार निर्मितीस हातभार लागेल असे मत खा डॉ. अजित गोपछडे यांनी व्यक्त केले आहे.



