DPT NEWS NETWORK
दर्शन पोलिस टाईम
प्रतिनिधी:- साईनाथ खंडेराय
नांदेड:- गोवर्धन घाट पुलावरुन एक महिला गोदावरी नदीमध्ये उडी मारुन स्वताचे जिवन संपवित असतांना नांदेड सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईका पथकातील पोकी 1097 खबडे, पोको 2035 अंबिलयाले यांनी त्यांचे प्राण वाचवून जिवदान दिले आहे.
मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, यांनी नांदेड शहरातील सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या गुन्हयांना आळा घालण्यासाठी स्थापन केलेल्या नांदेड सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह अंतर्गत पथकाने नांदेड शहरात दिनांक 01 फेब्रुवारी ते 04 मार्च, 2025 पर्यंत 657 जनावर वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हे दाखल करुन 2,10,500 /- दंड आकारण्यात आले त्यानुषंगाने नांदेड शहरातील पो.स्टे. विमानतळ भाग्यनगर, नांदेड ग्रामीण, वजीराबाद, शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैधरित्या दारु विक्री करणारे एकुण 04 जणांविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वे कलम 68 व कलम 64 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील आयटीआय चौक येथे वाढदिवसानिमीत्त सार्वजनिक ठिकाणों केक कापणारे 05 इसमांचे विरोधात म.पो. अधि कलम 110-117 प्रमाणे कारवाई करण्यात आली व सार्वजनिक ठिकाणी गोंधळ करुन शांतता भंग करणारे एकुण 183 इसमांविरोधात कारवाई केली तसेच शहरात मोटार सायकलचा सायलन्सर काढून कर्कश आवाज करणारे, व बुलेट मोटार सायकलचे सायलन्सरमध्ये बदल करुन महापुरुषांच्या जयंती व सणासुदौला फटका आवाज करुन सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग व ध्यानी प्रदुषाण ध्वनी करणारे 207 बुलेट वइतर मोटार सायकल चालकाविरुध्द पथकाने संवधीत पोलीस स्टेशनने कारवाई करण्यात आलो आहे. तसेच मोटार वाहन अधिनियम कायदा अंतर्गत शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी लावून 258 वाहन चालकाविरुध्द कारवाई करुन त्यांचे कडुन 2,10,500/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे. तसेच नांदेड शहरात बेकायदेशीर तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणारे कोप्टा कायदा नुसार 5 इसमाविरुध्द कारवाई करण्यात आली आहे.
दिनांक 07/02/2025 रमाई जयंती उत्सवामध्ये खंजर पेयुन फिरणारे व्यक्तीविरुध्द वजिराबाद पोलीस स्टेशन येथे तसेच दिनांक 04/03/2025 रोजी पोस्टे भाग्यनगर होत खुलेआम यांजर पेवुन फिरणारे दोन व्यक्तीविरुध्दात कारवाई करण्यात आली.
तसेच दामिनी पथक व सदर पथकातील अधीकारी यांनी शहरातील शाळा, कॉलेज, वस्तीगृह, कोचिंग क्लासेस वा ठिकाणी भेटी देवुन कायदा बावत सहीती देवून वैयक्तीक व सामाजीक सुरक्षेच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. तसेच शहरातील विविध ठिकाणी असलेले कॉफी शॉप तपासणी करुन गैरप्रकार होणार नाहीत या बाबत सूचना दिल्या आहेत.
तसेच नांदेड पोलीस दलातर्फे जनतेस अवाहन करण्यात येते की, बुलेटला कंपणी व्यतिरीक्त इतर कोणत्याही कंपणीचे सायलेन्सर वापरु नये, लहान मुलांना वाहन चालवण्यास देवू नये, विनाकारण रस्त्यावर फिरु नये, विणाकारण फिरतांना आढळल्यास त्यांचे विरुद कठोर कारवाई करण्यात येईल असे पण सांगण्यात आले.
नांदेड सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह अंतर्गत पथकाने मा. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, मा. सुरज गुरव अपर पोलीस अधीक्षक नादेड यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख सपोनि संकेत दिघे, तसेच पोउपनि खंडु वर्शने महिला दामीनी पथकातील मपोउपनि. श्रीमती नमिता देशमुख रेणुका जाधव यांनी व इतर पोलीस अंमलदार यांचेसह नांदेड शहरात दिनांक 01 फेब्रुवारी ते 04 मार्च, 2025 चे दरम्यान कारवाई केली आहे