DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- सुनील मैदिले
भिवापूर : संविधानाचे शिल्पकार, ज्ञानाचा प्रतीक, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती येथील जिल्हा परिषदेच्या मेन प्राथमिक शाळेत उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सायंटिफिक एज्युकेशन सोसायटीचे संचालक डॉक्टर वसंत खवास प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. खवास यांनी चौथ्या वर्गात उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी त्यांच्या सायंटिफिक कॉन्व्हेंट मध्ये पाचवी ते दहावीपर्यंत विनामूल्य प्रवेश देण्याची घोषणा केली. ही घोषणा मुख्याध्यापकांच्या विनंतीनंतर करण्यात आली असून, विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे.


कार्यक्रमाची सांगता अर्चनाताई खडसंग यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित स्नेहभोजनाने करण्यात आली. यशस्वीतेसाठी युवराज करनुके व शिक्षकांनी परिश्रम घेतले.



