*दोन दिवसात वाळूचे तीन ट्रक जप्त
* लाखोचा दंड थोठावणार
DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 ✍️ 🗞️✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- अमर मोकाशी
भिवापूर : वाळू तस्करीवर लगाम घालण्यासाठी महसूल प्रशासनाने चोख पावले उचलली असून, तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांच्या नेतृत्वात दोन दिवसांत अवैध वाळू वाहतूक करणारे तीन ट्रक जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईने वाळू तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
आज सकाळी पवनीहून उमरेडकडे जाणारे दोन ट्रक ( एमएच 36 एए 7879 व एमएच 40 सीडी 0901) थांबवून तपासण्यात आले. तपासणी दरम्यान त्यात प्रत्येकी सुमारे 8 ब्रास रेती आढळून आली. मात्र, चालकांकडे रेती वाहतुकीसाठी आवश्यक परवाना नसल्यामुळे दोन्ही ट्रक ताब्यात घेण्यात आले.
तसेच, गत सोमवारी उमरेडच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक (एमएच 33 क्यू 0036) मध्ये 10 ब्रास रेती आढळून आली होती. या प्रकरणातही चालकाकडे कोणताही अधिकृत परवाना नसल्याने ट्रक जप्त करण्यात आला. या तीनही ट्रकचे मालक मो.कैफ मो.शकील (पवनी), लक्ष्मण कळंबे (आराध्या नगर, नागपूर) आणि सचिन फटींग (पाचगाव) – यांच्यावर प्रत्येकी सुमारे 3 लाखांच्या जवळपास दंड आकारण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार डहाट यांनी दिली.
आतापर्यंत पोलीस विभागाच्या कारवायांमुळे वाळू तस्करांची धडधड वाढली होती, मात्र आता महसूल विभागही ऍक्शन मोड मध्ये आल्यामुळे तस्करांच्या गोटात खळबळ माजली आहे.
—-> तहसील कार्यालयातील ‘तो’ कर्मचारी कोण…?
वाळू तस्करीसंदर्भात तहसील कार्यालयातील एका कर्मचाऱ्याचे नाव सध्या चर्चेत आहे. संबंधित कर्मचारी मोबाईल फोनद्वारे वाळू तस्करांशी सातत्याने संपर्कात राहत असून, अधिकाऱ्यांच्या हालचालींची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच तस्करांवर कारवाई करताना अधिकारी अपयशी ठरत असल्याचे बोलले जाते.
सुत्रांच्या माहितीनुसार, या कर्मचाऱ्याजवळ दोन मोबाईल संच आणि चार सिमकार्ड आहेत. त्याच्या कॉल रेकॉर्डची तपासणी केल्यास अनेक धक्कादायक बाबी उघड होऊ शकतात आणि वाळू तस्करीच्या साखळीला खीळ घालणे अधिक सुलभ होईल, असा सल्ला काही जाणकारांनी दिला आहे.



