DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी : रायाप्पा मंडले
श्री गणेश ही विद्येची देवता आहे याचे स्मरण ठेवून येणाऱ्या गणेशोत्सवात केवळ गणेश उत्सव साजरा न करता गणेश मंडळांनी सर्वत्र विद्येचा उत्सव साजरा करावा असे आवाहन निलंगा येथे नव्याने आलेले उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन कुटेकर यांनी कासार शिरसी येथील आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत केले समारंभाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रतिनिधी ज्ञानेश्वर मडोळे हे होते या निमित्य नितीन कुटेकर यांचा शहरातील विविध गणेश मंडळ व ग्रामपंचायतीच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव उत्साहात व शांततापूर्ण वातावरणात संपन्न व्हावा यासाठी कासार शिरशी सह परिसरातील 68 गावातील सर्व गणेश मंडळे सरपंच व पोलीस पाटील यांची कासार शिरसी पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता कमिटीची बैठक आयोजनात आली होती या बैठकीस शहरातील गणेश मंडळे व्यापारी व सामाजिक कार्यकर्त्यातून मोठा प्रतिसाद लाभला
आगामी गणेश उत्सव शांततेत संपन्न व्हावा यासाठी पोलिसांच्या वतीने अनेक उपाय व समुपदेशन अभियान राबवण्यात येत आहे असे सांगून एपीआय रियाज शेख यांनी सर्वच गणेश मंडळांनी सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव साजरा करायचा असेल तर मंडळांना ऑनलाइन पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य आहे शिवाय प्रत्येक गणेश मंडळांनी प्रत्येकी दहा कार्यकर्त्यांची यादी पोलिसांना देणे अनिवार्य असल्याचे सांगितले मंडळांनी मिरवणुकी मार्गात बदल करू नये अनाधिकृत वीज जोडणी डॉल्बी वाजवू नये अशा सूचना दिल्या व ग्रामस्थांनी एक गाव एक गणपती साजरा करण्याचे आवाहन केले.
यानिमित्त शहरात शांतता कमिटी स्थापन करण्यात आली असून अध्यक्ष बाबू मिया लामजणे उपाध्यक्ष प्रमोद वेल्हाळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून वीस सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे याप्रसंगी उप पोलिस अधिकारी सदानंद भुजबळ पोलीस कर्मचारी यांचे सह व्यापारी बाळूमामा वेल्हाळ मयूर गब्बुरे धनराज होळकुंदे विवेक कोकणे अप्पू चिंचनसुरे जिलानी बागवान नारायण डोंबाळे यांचे सह मोठा जनसमुदाय हजर होता.