नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मुर्तिजापुरात विविध ठिकाणी कचरा पेटवुन दिल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात !

नगरपरिषदेचे दुर्लक्ष: धुरामुळे नागरिकांचे आरोग्य आणि वाहतूकीला धोका..

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- मिलिंद इंगळे

मुर्तिजापुर : शहरात दररोज जमा होणाऱ्या घनकचऱ्यावर प्रक्रिया करुन त्याची सुरक्षित विल्हेवाट लावण्याऐवजी,नगरपरिषदेकडुन चक्क तो पेटवुन दिला जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. परिणामी या धुरामुळे परिसरात प्रचंड प्रदुषण निर्माण होत असुन,नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे
राष्ट्रीय महामार्ग ५३ जवळील कोहिनुर हाॅटेल जवळ,सोनाळा रोड या ठिकाणी कचरा विल्हेवाट केंद्र उभारण्यात आले आहे. कंत्राटी पद्धतीने करोडो रुपयांच्या यंत्रणाव्दारे घनकचरा व्यवस्थापनासाठी उपाययोजना करण्यात आली असतांना ही,ठेकेदाराकडुन कचरा सर्रासपणे पेटवुन दिले जात आहे.या धुरामुळे नविन पटवारी
कॉलनी,प्रजापती लेआऊट, नविन घरकुल, पहाडीपुरा,आदी भागातील नागरिकांना श्वसनाचे विकार,डोळात जळजळ,त्वचाविकार याचा सामना करावा लागत आहे.
विशेष म्हणजे या धुरामुळे महामार्गावर दुष्यमानता कमी होत असुन अपघाताचा धोका वाढला आहे. काही महिन्यापुर्वी या मार्गावर अपघातात काही नागरिकांना प्राण गमवावा लागला होता.
कारवाईची मागणी केली असताना सुद्धा
नगर परिषद प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे त्यामुळे ठेकेदारावर कोणतीही कारवाई झालेली नाही. तसेच नविन वसाहतींना साध्या पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन अध्याप देण्यात आलेली नाही. हि बाबा अधिक चिंताजनक ठरत आहे.या गंभीर प्रकाराकडे आमदार श्री.हरिश पिंपळे यांनी स्वतः लक्ष घालुन नगरपरिषदेच्या अधिकारी यांची कानउघाडणी करावी अशी मागणी नागरिकांमधुन होत आहे.
“दररोज कचरा पेटवल्यामुळे परिसरात धुर आणि दुर्गंधी पसरत आहे.त्यामुळे नागरिकांना श्वसनाचे विकार भेडसावत आहे तसेच राहणे ही कठीण झाले आहे.”
त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी विनंती करण्यात येते आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:29 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!