नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मिरजेतील डॉक्टरला अटक : परिचारिकेवर बलात्कार, सर्वत्र जोरदार चर्चा..!

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- राजेंद्र पवार

सांगली:- परिचारिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी मिरजेतील डॉ. सुयोग ऊर्फ बॉबी आरवट्टगी (वय 40, रा. मिरज) याला गोव्यातील कुंकळ्ळी पोलिसांनी अटक केली असून, डॉ. आरवट्टगी याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.डॉ. सुयोग हा गोव्यात कुंकळ्ळी येथे वैद्यकीय व्यवसाय करीत आहे. एक महिन्यापूर्वी संबंधित डॉक्टरने त्याच्या खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकेस रुग्णाच्या तपासणीच्या बहाण्याने त्याच्या निवासस्थानी नेले. यावेळी डॉ. आरवट्टगी याने या परिचारिकेवर बलात्कार केल्याची तक्रार आहे. या घटनेनंतर पीडित परिचारिकेने गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडितेच्या आईने पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तीन दिवस पोलिस कोठडी दिल्यानंतर न्यायालयाने डॉ. आरवट्टगी याला 14 दिवस न्यायालयीन कोठडी दिल्याने त्याची रवानगी कोलवाळ कारागृहात करण्यात आली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:28 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!