जेठालाल
दिलीप जोशी (जेठालाल): कॉमेडी टीव्ही मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ घरोघरी प्रसिद्ध आहे. ही टीव्ही मालिका 2008 पासून सातत्याने प्रसारित केली जात आहे आणि आजही ती टीआरपीच्या शर्यतीत अनेक मालिकांना आव्हान देत आहे. या टीव्ही सीरियलमध्ये दिलीप जोशीपासून ते बापूजीच्या भूमिकेत अमित भट्ट आणि बबिताच्या भूमिकेत मुनमुन दत्ता अशी एकापेक्षा एक व्यक्तिरेखा पाहायला मिळतात. मात्र, आज आपण दिलीप जोशींबद्दल बोलणार आहोत जे आपल्या जेठालाल या व्यक्तिरेखेमुळे घरोघरी प्रसिद्ध झाले आहेत. तारक मेहता का उल्टा चष्मा ऑफर होण्यापूर्वी दिलीप बेरोजगार होता हे तुम्हाला माहीत आहे का?
एक वर्ष होता बेरोजगार
दिलीप जोशीने स्वतः एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की, तेव्हा ते ज्या मालिकेत काम करायचे ती मालिका बंद झाली. त्यामुळे जवळपास एक वर्ष ते बेरोजगार होते, त्यांच्याकडे काम नव्हते. दिलीप जोशीने चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णयही घेतला होता. मात्र, नंतर त्याला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ऑफर मिळाली आणि त्याचे संपूर्ण नशीब उलटले.
इतकी आहे संपत्ती
दिलीप जोशीचे नाव आज टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये सामील आहे. एवढेच नाही तर दिलीप जोशी यांच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याची एकूण संपत्ती 37 कोटी रुपये आहे.
जेठालालला एका भागाचं मिळतं एवढं मानधन
दिलीप जोशी एका एपिसोडसाठी 1.5 लाख रुपये मानधन घेतात. ते या मालिकेतील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते आहेत.