नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

प्रेमाचे संस्कार

प्रेम असतं सुंदर
त्याला जपावं लागतं
ओल्या मनाच्या मातीत
प्रेम रुजवावं लागतं…

प्रेम म्हणजे जगातली सर्वात सुंदर गोष्ट. प्रेम कोणतेही असो ते फक्त प्रेम असते मात्र,वयाच्या प्रत्येक टप्प्याला प्रेमाच्या स्वरूपात हळूहळू बदल घडत जातो. बालपणात कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीकडून मिळालेलं प्रेम, जीवनाला एक नवा आकार देतो तेच प्रेम हळुहळु किशोर वयात आल्यानंतर काळजीच्या स्वरूपात परिवर्तित होतो त्यामुळे, बालपणात सारखे हवेसे असणारे आई बाबांचे प्रेम आता ‘हे करू नको,ते करू नको’ ऐकून ऐकून नकोसे होऊन जाते. अशावेळी गरज भासते ती एका अशा व्यक्तीची जी आपली बाजू समजू शकतो, आपल्यामधील चुका शोधण्याऐवजी आपल्यामध्ये असलेल्या गुणांचा कौतुक करतो तेव्हा ती व्यक्ती कोणतीही असू शकते, यासाठी वयाचे बंधन नसते पूर्वी एकत्र कुटुंबामध्ये ही जागा घरातील आजी-आजोबांना दिली जायची कारण वयाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये असलेल्या आजी- आजोबांना आपल्या मुलांपेक्षा नातू नाती अधिक गुणवान वाटायचे सारखे सारखे आजी आजोबांकडून मिळणारे कौतुक किती जरी चुका झाल्या तरी नातवांना जवळ करणारे आजी-आजोबा किशोरवयीन मुलांना घरातील सर्वात महत्त्वाचा आधार वाटायची. काळानुसार नोकरी, उद्योगधंदे यानिमित्ताने शहराकडे वाटचाल करणाऱ्यांची संख्या वाढत गेली एकत्र कुटुंब पद्धतीचे रूपांतर हळूहळू स्वतंत्र कुटुंब पद्धतीत होऊ लागले आणि या स्वतंत्र कुटुंब पद्धतीमध्ये आजी-आजोबांचे अस्तित्व देखील राहिले नाही आणि याचाच अर्थ म्हणजे किशोरवयीन मुलांना आधार देणारे सुद्धा घरात राहिले नाही आणि याचाच परिणाम आज सर्वत्र पाहायला मिळत आहे ते म्हणजे मिळेल त्या मार्गाने आजचे अनेक युवक युवती प्रेम आणि एक मानसिक आधार मिळावा यासाठी कोणत्याही परिणामाचा विचार न करता वाईट दिशेला भरकटत आहे. एकमेकाबद्दल निर्माण झालेले आकर्षण यालाच प्रेमाचे नाव देऊन आपल्या करिअरबरोबर आपले संपूर्ण आयुष्य देखील संपवून टाकणारे अनेक उदाहरण देखील आपल्या अवतीभवती रोज घडत आहे. अशावेळी नकळतपणे एक प्रश्‍न समोर उभा राहतो आणि तो म्हणजे जे काही होत आहे या सर्वांसाठी जबाबदार कोण..?

जो युवा वर्ग देशाची सर्वात मोठी संपत्ती आहे त्यालाच योग्य मार्गदर्शन, योग्य मानसिक आधार न मिळाल्यामुळे भरकटत असेल तर याला जबाबदार कोण..? या प्रश्नाचा शांतपणे विचार केला तर समोर एकच उत्तर येते आणि ते म्हणजे आजच्या तरुण पिढीला एका मानसिक आधारासाठी आणि प्रेमासाठी भरकटण्याची वेळ जर कोणी आणली असेल तर ती म्हणजे आजचा आधुनिक पालक वर्ग हो आजचा आपला पालक वर्ग आपल्या पाल्यांसाठी सर्व सुख सोयी उपलब्ध व्हाव्यात यासाठी खूप खूप मेहनत घेत आहे मात्र, ज्यांच्या साठी आपण हे सर्व करत आहोत त्यांना याहीपेक्षा काहीतरी वेगळं हवं आहे आणि ते म्हणजे तुमचा वेळ. ज्याप्रमाणे एखादं छोटंसं रोपटं मातीत उगवायच म्हटलं की, त्यासाठी मातीमध्ये ओलाव्याची गरज असते अगदी त्याच प्रमाणे बालपणातून युवा अवस्थेकडे जाणाऱ्या किशोरवयीन मुलांमध्ये देखील प्रेमाच बीज आकार घेत असताना त्यांच्या कोवळ्या मनाच्या मातीमध्ये आई वडीलाविषयी आपलेपणाची, विश्वासाची ओल असणे खूप आवश्यक आहे तेव्हाच कुठे ते आपल्या जीवनात योग्य निर्णय घेऊ शकतील आणि स्वतःला वाईट मार्गाच्या आहारी जाण्यापासून वाचवू शकतील.

येणाऱ्या पिढीला खऱ्या प्रेमाचे संस्कार कुटुंबातूनच दिले गेले पाहिजे याकरिता कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने एकमेकांना मानसिक आधार देत आपण सर्व सोबत आहोत, जीवनातील कोणतीही समस्या असो त्यावर आपण सर्वजण एकत्रपणे मात करू शकतो, हा विश्वास निर्माण केला पाहिजे. कधीतरी महिन्याला एखाद वेळेस कुटुंबातील सर्वांसाठी आवडीची खरेदी करणे, त्यामध्ये मुलांना त्यांच्या आवडीची खेळणी, चॉकलेट्स निवडण्याचा अधिकार त्यांना दिला गेला पाहिजे. न विसरता कधीतरी आपल्या जोडीदारासाठी फ्लॉवर्स आणणे, कधीतरी न सांगता सर्वांसाठी सरप्राईज पार्टी ठेवणे, आपण आपल्या अनुभवातून कसे शिकत गेलो याचे उदाहरण मुलांसोबत मांडत आपल्याकडून देखील चूक व्हायची, त्यातून आपण कसे शिकत गेलो हे उदाहरण मुलांसमोर शेअर करणे, घरातील एकमेकांच्या आवडीनिवडी जपण्याचे संस्कार देणे… अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण वर्षभर करू शकतो ज्यामुळे आपल्या घरातील किशोरवयीन मुलांना प्रेम व्यक्त करण्यासाठी एका विशिष्ट दिवसाची आवश्यकता नसते तर प्रत्येक दिवस हा प्रेमाचाच असतो त्याचे संस्कार आपोआप मिळत जातील आणि आपले येणारे जीवन देखील आपण असेच जगू याची प्रेरणा देखील त्यांना आपल्याच कुटुंबातून आपोआप मिळत जाईल.

पुनम सुलाने, जालना

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:59 am, January 13, 2025
temperature icon 24°C
साफ आकाश
Humidity 39 %
Wind 7 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!