विविध देशातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला सन्मान सोहळा
मुंबई : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि २९ व्या वर्धापन दिनानिमित्त इंडो मंगोलियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या दोन आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने द पिल्लर ऑफ हिंदुस्थानी सोसायटी २०२१-२०२२ या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा सन्मान सोहळा ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे सचिव डॉ. संजय भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी ओल्ड रॉयल मुंबई याच क्लब गेटवे ऑफ इंडियाच्या समोर, मुंबई येथे पार पडला.
या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून मेजर जनरल श्री शिशिर महाजन, एच ई ॲम्बासॅडर श्री वलशन वेथोडी ( श्रीलंका) श्री ओलहास अलिपबायव ( कझाकीस्थान), श्री क्रिस हाँग( कोरिया), श्री ब्रुनो ब्रॉंकॉर्ड ( फ्रेंच चेंबर), श्री परेश मेहता, श्री सतीनंदर आहुजा (जॉर्जिया झाकिया वर्डक( अफगाणिस्तान), श्री प्रवीण लुंकड, श्री जे के चतुर्वेदी, श्री उदय नाईक, उद्योजक श्री विठ्ठल कामत, श्री एकनाथ तांबवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी प्रसिद्ध उद्योग जक श्री विठ्ठल कामत, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, मुंबईचे डायरेक्टर जनरल श्री संदीप खोसला, प्रसिद्ध ढोलकिवादक श्री विजय चव्हाण, सोमय्या कॉलेज,मुंबईचे प्राचार्य डॉ. एस के उकरांडे, शास्त्रज्ञ श्री हेमंत रोहेरा, शिपिंग विभागाचे श्री शब्बीर रंगवाला, आंतरराष्ट्रीय वाणिज्य व व्यापाराच्या तरुण प्रचारक श्री मनप्रितसिंग नागी, प्रसिद्ध महिला तबला वादक श्रीमती अनुराधा पाल, आर्किटेक्चर व्यावसायिक श्री प्रेम नाथ आदी मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. या सन्मान सोहळ्याचे उत्कृष्ट प्रास्ताविक व निवेदन डॉ. संजय भिडे यांनी केले. याप्रसंगी ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि २९ व्या वर्धापन दिनानिमित्त इंडो मंगोलियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या दोन आंतरराष्ट्रीय संस्थेचे व्ही आय पी पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.