शहादा प्रतिनिधी राहुल आगळे
शहादा तालुक्यातील खैरवे भडगांव येथील कृष्णा चैत्राम भिल व रूंझाबाई आनंदसिंग भील यांच्या घराला रात्री 7 वाजेच्या सुमारास लागली अचानक आग. सर्व गावांत काही मिनिटांत बातमी पसरली आणि पाऊन तासानंतर गांवकऱ्यांच्या प्रयत्नांना आग विझविण्यात यश आले.
वातावरणात हवा शांत असल्यामुळे आजूबाजूच्या घरांना आगीपासून वाचवु शकले. आगीमुळे कुठलीही जीवितहाणी झाली नसली तरी कृष्णा भील व रुंझाबाई भील यांच्या घरातील विविध जीवनावश्यक वस्तुंचे नुकसान झाले. आगीचे नेमके कारण अद्यापही कळू शकले नाही.
घटनास्थळी पोलिसपाटिल धनराज पानपाटिल, पंचायत समिति सदस्य प्रतिनिधि देवेंद्र पानपाटिल, ब्ल्यू टायगर ग्रुप अध्यक्ष संजय पानपाटिल, माजी पोलिस पाटिल भरतसिंग गिरासे, दिलीप गिरासे, गोपाल निकुंबे, दिपक पानपाटिल, किरण पवार, महारु भील, देवीदास भील, सचिन पानपाटिल, शिवा भील, राकेश पटेल, समाधान भील, काशीनाथ भील इत्यादींनी शर्थीचे प्रयत्न करुन त्यात पोलिस पाटिल धनराज पानपाटिल व किरण पवार हे स्वतः जख्मी होऊन देखीलही आग विझवली.