प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार- धडगाव येथील अंगणवाडी सेविकेचा मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीस धडगाव न्यायालयाने १ वर्ष ७ महिने सश्रम कारावास व रुपये ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की , दि १५/०६/२०२० ते १६/०६/२०२० रोजी दरम्यान सकाळी ०७.०० वाजेपावेतो फिर्यादी केसरीबाई परमार यांचे सोबत घडली होती . फिर्यादी केसरीबाई नथ्थु परमार वय ६५ हया धडगाव , कृष्णा नगर येथील रहीवासी असुन अंगणवाडी सेविकेचे कामकाज करतात . फिर्यादी यांना अंगणवाडीचे कामकाजाकरीता आय.डी.सी.एस. कार्यालय , धडगाव यांचेकडुन पॅनॉसोनिक कंपनीचा ELUGA – १७ हा मोबाईल मिळाला होता .
सदर मोबाईल हा कार्यालयीन उपयोगासाठी असल्याने फिर्यादी हया नेहमी त्यांचे जवळ ठेवत होत्या .
दि . १५/०६/२०२० रोजी फिर्यादी हया सकाळी सुरवाणी येथे मिटींग करुन दुपारी ०४.०० वा .
धडगाव येथील त्यांचे राहते घरी येवुन घरातील पुढील कामे आटोपुन रात्री १०.०० वाजताचे सुमारास झोपण्यापुर्वी त्यांनी त्यांचा मोबाईल बॅगमध्ये ठेवून सदर बॅग घरातील रॅकवर ठेवली होती . दि . १६/०६/२०२० रोजी सकाळी ०७.०० वाजता फिर्यादी यांनी त्यांचे दैनंदिन कामकाजकरीत असतांना सकाळी १०.०० वाजता त्यांची सुरत येथे राहणारी मुलगी रेखा हिचा मिसकॉल लहान मुलगी बबिता हिचे मोबाईलवर आला होता म्हणुन तिला फोन करण्यासाठी ऑफीसचा मोबाईल घेण्यासाठी रॅकवर ठेवलेली बॅग उघडली असता त्यात मोबाईल मिळुन आला नाही . मोबाईल मुलगी बविता हिचेकडेस असले म्हणुन तिला विचारले असता तिच्याकडे मोबाईल नसल्याचे तिने फिर्यादीस सांगितले होते . त्यानंतर फिर्यादी केसरीबाई यांनी घराचे आजुबाजुला असणारे रहीवासी यांना देखील विचारपुस केली असता त्यांनी देखील मोबाईल बाबत माहिती नसल्याचे सांगितले होते . मोबाईल घरातच कुठेतरी अनावधाने ठेवला गेला असेल म्हणुन फिर्यादी केसरीबाई यांनी पुन्हा त्यांच्या घरात मोबाईलची शोधाशोध केली परंतु मोबाईल मिळुन आलेला नाही . तेव्हा केसरीबाई यांना लक्षात आले की , कोणी तरी अज्ञात चोरटयाने त्यांचे संमती शिवाय स्वतःच्या फायदयासाठी लबाडीच्या इरादयाने सदरचा मोबाईल चोरुन नेला आहे . अशी खात्री झाल्याने सदर घटने बाबत फिर्यादी यांनी अंगणवाडी कार्यालयातील सुपरवायझर उषा पाडवी यांना कळविले असता त्यांनी सांगितले की , मोबाईल चोरीला गेल्याने पोलीस ठाणेत फिर्याद दयावी लागेल म्हणुन फिर्यादी केसरीबाई यांचे तक्रारीवरुन धडगाव पोलीस ठाणेत अज्ञात चोरटयाविरुध्द तक्रार दाखल केली होती . सदर गुन्हयाचा पुढील सखोल तपास पोहेकॉ / दिलीप साळवे यांनी केला होता , तपासात मोहसिन ऊर्फ मोहसिन अय्युब बेलदार याने मोबाईल चोरी केल्याचे उघडकीस आले होते . म्हणुन त्याचेविरुध्द मा . न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते . सदर खटल्याची सुनावणी मा . श्री . दिपक जी . कंखरे , जे.एम.एफ.सी. न्यायाधीश सो . धडगाव यांचे कोर्टात होवुन आरोपी मोहसिन ऊर्फ मोहसिन अय्युव वेलदार याचेविरुध्द भा.द.वि.क. ३८० अन्वये गुन्हा शाबीत झाल्याने मा . न्यायालयाने आरोपीस १ वर्ष ७ महिने सश्रम कारावास व रुपये ५०० / – दंडाची क्षा सुनावली आहे .
सदर खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता अॅड . बी.आर वळवी यांनी पाहीले असुन खटल्यात पैरवी अधिकारी म्हणुन पो.कॉ. समाधान केंद्रे यांनी कामकाज केले आहे .
तपास अधिकारी , सरकारी वकील व पैरवी अधिकारी यांचे मा.पोलीस अधीक्षक , नंदुरबार श्री . पी . आर . पाटील व मा . अपर पोलीस अधीक्षक श्री . विजय पवार यांनी हार्दीक अभिनंदन केले आहे .