नंदुरबार – रविंद्र गवळे
शहादा तालुक्यातील डोंगरगाव केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व प्राथमिक शाळांची नुकतीच शिक्षण परिषद के डी गावित अनुदानित प्राथमिक आश्रम शाळा वडछिल येथे संपन्न झाली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्ताराधिकारी श्रीमती ममता पटेल यांना आमंत्रित केले होते तर अध्यक्ष म्हणून डोंगरगाव केंद्राचे केंद्रप्रमुख शंकर अहिरे हे होते.
या शिक्षण परिषदेत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी डोंगरगाव येथील शिक्षिका स्वाती पाटील व वडछिल येथील शिक्षिका रेखा दुरंगी यांनी इंग्रजी साहित्य पेटी उपक्रम विषयी माहिती दिली तर कवठळ त श येथील शिक्षक जगन पावरा यांनी निपुण भारत अभियान विषयी माहिती देऊन त्याचे महत्त्व पटवून दिले व डोंगरगाव येथील शिक्षिका अंबिका गायकवाड यांनी जीवन शिक्षण मासिक विषयी माहिती दिली तसेच मोहीदा येथील शिक्षक भूषण पाचपुते यांनी शाळा पूर्वतयारी विषयी माहिती दिली. यावेळी डोंगरगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री शंकर आहिरे यांनी शाळाबाह्य विद्यार्थी, राज्यस्तरीय राबविले जाणारे उपक्रम, १०० दिवस वाचना अभियान, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव स्पर्धा, परीक्षा पे चर्चा, स्टार प्रोजेक्ट असे अनेक विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी अनुदानित आश्रम शाळेचे शिक्षक मनोज पाटील यांनी प्रास्ताविक केले.