नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

राजभाषादिना निमित्त “निवडक कुसुमाग्रज” हा कार्यक्रम  संपन्न 

सुतारवाडी दि. 28 हरिश्चंद्र महाडिक 
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा रोहा व भाटे सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २७ फेब्रुवारी 2022 रोजी मराठी राजभाषा दिनानिमित्त” निवडक कुसुमाग्रज” या कार्यक्रमाचे आयोजन भाटे वाचनालय रोहा येथे करण्यात आले . रायगड भुषण श्री सुखद राणे व भाटे सार्वजनिक वाचनालय अध्यक्ष श्री . किशोर तावडे यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सौ . संध्या दिवकर यांनी सांगितले .को म . सा . प . शाखा रोहाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सौ संध्या दिवकर यांनी प्रास्ताविकात  कुसुमाग्रजांचे साहित्य आपल्याला जगण्यास शिकवते, प्रेरणा देते असे सांगितले . श्री बाबाजी धोत्रे, श्री विजय दिवकर, श्री सुधीर क्षिरसागर , सौ . वृशाली देशमुख ,सौ वर्षाराणी मुंगसे , श्री घागसर सौ . सुप्रिया क्षिरसागर , कु .निकीता बोथरे कु . वृद्धी भगत कु . स्वराज दिवकर . यांनी कुसुमाग्रजांचे निवडक लेख व कविता सादर करून रसिकांची मने जिंकली .श्री किशोर तावडे , अध्यक्ष, भाटे सार्वजनिक वाचनालय रोहे .यांनी आपले मनोगत मांडले .या कार्यक्रमासाठी मा श्री मकरंद बारटक्के, रायगड जिल्हा मराठी भाषा समिती सदस्य यांची प्रमुख उपस्थिती लाभली . कुसुमाग्रजांच्या साहित्याविषयी बोलताना ते म्हणाले की नटसम्राट सारख्या एखादया नाटकातील  एक जरी संवाद ऐकला तरी आपला आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून जातो . ध्येय श्रेष्ठ असेल तर तो मनुष्य आपल्या ध्येयाने श्रेष्ठ होतो . आपल्या संकल्पाप्रती  आपली आत्मियता हवी . उत्तम साहित्य आपल्याला संस्कारीत करतात . चांगले साहित्य वाचले तर येणारी पिढी नक्कीच संस्कारीत होईल  असा विश्वास त त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केला .या कार्यक्रमास पत्रकार श्री . सचीन साळुंके व श्री राजेश हजारे उपस्थित होते .या कार्यकमासाठी श्री . किशोर तावडे श्री . सुखद राणे , सौ संध्या दिवकर,श्री कुलकर्णी ,श्री . विजय दिवकर  यांनी विशेष मेहनत घेतली . सुत्रसंचालन श्री नारायण पानवकर व कु निकीता बोथरे यांनी केले .आभार श्री सुधीर क्षीरसागर यांनी मानले .

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:44 am, January 13, 2025
temperature icon 24°C
साफ आकाश
Humidity 39 %
Wind 7 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!