प्रतिनिधी
प्रा. भरत चव्हाण
तळोदा -महाराष्ट्र राज्यातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथील सिताखाई पॉईंट वरून पबजी नावाचा गेम खेळण्याचा नादात उडी घेत एका २२ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली . या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोदं करण्यात आली आहे .
या बाबत अधिक माहिती अशी कि , विजय जुलेश ठाकूर ( वय २२ ) रा . मेन बाजार तोरणमाळ , ता . धडगांव हा युवक मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत सिताखाई पॉईंट वर नेटवर्क असल्याने तेथे गेला . मित्रांसोबत पबजी नावाचा गेम खेळण्याचा नादात सिताखाई आत्महत्या करण्यासाठी पुढे जात असताना अचानक जवळील मित्राने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता मित्राला दगड मारून सिताखाईत उडी घेत आत्महत्या केली . तात्काळ या युवकाचे मित्र व नातेवाईकांनी सिताखाई गाठली परंतु या युवकाने सिताखाईत उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली . रात्री जास्त उशीर झाल्याने मृतदेह बाहेर काढण्यासाठी वन्यप्राण्यांच्या धाकाने तसेच रात्री सिताखाईत उतरण्यासाठी साधने उपलब्ध नसल्याने स्थानिक नागरिक जिवन रावताळे , रवी चौधरी , भरत चौधरी विक्की चव्हाण , जिरबान नाईक , मोना नाईक , मनोज रावताळे , पिण्या रावताळे , सुरेश ठाकुर , विकला नाईक , गुंजा नाईक सह ग्रामस्थांनी मृतदेह बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास सिताखाईत खोल दरीत उतरुन दोरीच्या साहाय्याने मृत्यूदेहबाहेर काढले व तोरणमाळ येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ . सुहास पाटील यांनी शवविच्छेदनकेले.त्यानंतर मृतदेह त्यांचा नातेवाईकांना दिला . यावेळी पोलीस तोरणमाळ बिटचे चंदू साबळे , सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते . याबाबत म्हसावद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून ,
पुढील तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.को.चंदू साबळे हे करीत आहेत .