नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

दुसऱ्याच ते कार्ट अन आपला तो बाळा, पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामपंचायतीने केला घरकुल घोटाळा.


भुवनेश दुसाने.(पाचोरा)

कधीकाळी आपल्या जिल्ह्याचे नाव घरकुल घोटाळ्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात गाजले होते. त्यानंतर आता पुन्हा जळगाव जिल्ह्यातील गावागावात मोठ्याप्रमाणात घरकुल घोटाळा उघडकीस येत असून या घोटाळ्यात आता गावागावातील पदाधिकारी, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी तसेच पंचायत समितीचे काही कर्मचारी यांचा सहभाग असल्याचे आरोप तसेच मोठ्या प्रमाणात तक्रारी समोर येत असल्याने आपल्याला घरकुल मिळणार नाही हे गृहीत धरून ज्या, ज्या बोगस लाभार्थ्यांनी घरकुलाचा लाभ मिळवून घेण्यासाठी पार्ट्या व पैशाची देवाणघेवाण केलेली होती त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने ते आता सगळे सत्य चारचौघात, चौकाचौकात सांगताना दिसून येत आहेत.
गोरगरीब, भूमिहीन, बेघर, हात मजूर व इतर बेघर लोकांसाठी शासनातर्फे पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, जाहीर करून ज्या लोकांजवळ घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसेल अशा लोकांना जागा विकत घेण्यासाठी पंडित दीनदयाल सहाय्यता निधीतून रक्कम देण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
या योजनेतील लाभार्यांना लाभ मिळवून देण्यासाठी लाभार्थ्यांची निवड करतांना शासनाने ठरवून दिलेल्या निकसा प्रमाणे सर्वे करून प्रत्येक ग्रामपंचायतीने दवंडी देत ग्रामसभा घेऊन निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची यादी ग्रामसभेत वाचून दाखवल्यावर काही हरकती आल्यास त्याचा निपटारा करुन योग्य व गरजू लाभार्थ्यांची यादी ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करून लाभ मिळवून देण्यासाठी पंचायत समितीकडे पाठवणे क्रमप्राप्त असते.
परंतु घरकुल लाभार्थ्यांची निवड करतांना (दुसऱ्याच ते कार्ट अन आपला तो बाळ्या) भविष्यातील येणाऱ्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवत बऱ्याचशा ठिकाणी आपपल्या कार्यकर्त्यांना, हौश्या, नौश्यांना खुश ठेवण्यासाठी घरकुल यादीत पदाधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावर ग्रामसभेत वाचून दाखवलेल्या व सर्वानुमते मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या यादीत घोळ करुन योग्य व गरजू लाभार्थ्यांना वंचित ठेवत मर्जीतील लोकांची नावे समाविष्ट करण्यात आल्याचा गैरप्रकार समोर येत असून गावागावातून मोठ्या प्रमाणात तक्रारी समोर येत आहेत.
असाच काहीसा गैरप्रकार पाचोरा तालुक्यातील मोठया लोकसंख्येचे गाव तिर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेले तसेच जास्त मतदाते असल्याने मतदारसंघात सगळ्यांची नजर असलेल्या पिंपळगाव हरेश्वर येथे घरकुल लाभार्थ्यांच्या यादीत करण्यात आला असल्याची तक्रार राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे जळगाव जिल्हाध्यक्ष मा. श्री. रणजित सुरेश तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली घरकुल लाभापासून वंचित झालेल्या शेकडो लाभार्थ्यांनी गटविकास अधिकारी पाचोरा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून घरकुल यादीत झालेल्या गैरप्रकाराची चौकशी न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
या निवेदनात पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामविकास अधिकारी व संबंधित लोक प्रतिनीधी यांनी अनुसूचित जमातीच्या वित्त वर्षीय एस.इ.सी.सी. २०२१ नुसार मंजुर झालेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभापासून वंचीत ठेवण्याच्या उद्देशाने बऱ्याच अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना लाभ मिळूनये म्हणून एका बाजुला हेतुपुरस्कर या पूर्वी घरकुल लाभ मिळाला आहे’ शेती नसतांना बागायती शेती आहे, सदर कुटुंब सधन आहे अशी खोटी माहिती लेखी स्वरूपात पंचायत समितीच्या कार्यालयास सादर करून खोटी व खोडसाळ माहीती पुरवून अनुसूचित जमातीच्या लोकांना जाणीवपूर्वक लाभापासून वंचीत ठेवून दुसरीकडे निवड / निकष १ ते १३ यामध्ये न बसणारे सधन, श्रीमंत, बागायतदार, एकच घरातील चार, चार लाभार्थी तसेच हेतुपूर्वक आपपल्या नातेवाईकांची, कार्यकर्त्यांची, हौश्या, नौश्यांची निवड करून बोगस लाभार्थ्यांना लाभ देत असल्याचे तक्रारी निवेदनात नमूद केले आहे.
तसेच जे खरे गरजु लाभार्थी आहेत त्यांना वंचीत ठेवण्यात आले असुन सदर प्रकार अतिशय गंभीर असल्याचे निवेदनात नमूद करत खोटी माहिती बनवून खऱ्या लाभार्थ्यांना वंचित ठेवणाऱ्या संबधीत कर्मचारी व लोक प्रतिनीधींची चौकशी करुन सदर कर्मचारी / लोकप्रतिनीधी यांच्यावर अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधीत कायदा १९८९ सुधारीत कायदा २०१५ कलम ३ (१) क्यु नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, व सत्यता तपासून गरजू लाभार्थ्यांना लाभ देण्यात येवून बोगस लाभार्थी यांचे १ ते १३ निकष तपासून त्यांची देखील चौकशी करण्यात यावी. असे न झाल्यास सदर प्रकरणात संघटनेमार्फत तिव्र आंदोलन छेडण्यात येईल व या आंदोलनापासून होणारे नुकसान, तसेच कायदा क सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ग्रामपंचायत व पंचायत समितीची राहील अश्या आशयाचे निवेदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिले असून या निवेदनाच्या प्रती अधिक माहिती साठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद जळगाव, मा. उपविभागीय अधिकारी पाचोरा भाग पाचोरा, मा.उपविभागीय पोलिस अधिकारी पाचोरा भाग पाचोरा यांच्याकडे पाठवण्यात आल्या आहेत.
याबाबत सत्यजित न्यूज कडून पिंपळगाव हरेश्वर येथे भेट देऊन सत्यता जाणून घेतली असता या तक्रारीत तथ्य आढळून आले आहे. कारण पिंपळगाव हरेश्वर येथील घरकुल लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी ग्रामपंचायतीने रितसर जाहीर निवेदन अर्थात (दवंडी) देऊन ग्रामसभा घेऊन ग्रामसभेत लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. या ग्रामसभेत पदाधिकारी व ग्रामस्थांच्या साक्षीने व संमतीने एकुण २४०० दोन हजार चारशे लाभार्थ्यांची निवड करण्यात येऊन निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी वाचून दाखवण्यात आली होती. तसेच त्यांची नावे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात माहिती फलकावर लावण्यात आली होती.
परंतु पंचायत समितीकडून जेव्हां घरकुल लाभार्थ्यांची नावे जाहीर झाली व त्या जाहीर झालेल्या लाभार्थ्यांच्या नावाची यादी जेव्हा ग्रामपंचायतीच्या माहिती फलकावर लावण्यात आली तेव्हा ग्रामसभेत सर्वानुमते निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची नावे अपात्रतेच्या यादीत व ज्यांच्या नावाची ग्रामसभेत निवड झालेली नाही अश्या नवख्या लोकांची नवीन नावे लाभार्थ्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच एकाच घरातील व्यक्तींचा पुन्हा, पुन्हा व एकच कुटुंबातील चार, चार व्यक्तींची नावे लाभार्थ्यांच्या यादीत आढळून आली असल्याचे पुराव्यानिशी काही सुज्ञ नागरिकांनी दाखवून दिले आहे.
ही हेराफेरी करण्यासाठी काही लोकांनी वाहत्या गंगेत हात धुऊन घेतल्याची जोरदारपणे चर्चा होत असून काही लोकांनी या घरकुल लाभार्थ्यांच्या यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी ओल्या पार्ट्या तसेच दोन हजार रुपयांपासून तर दहा रुपयांची खैरात वाटल्याची चर्चा आहे. परंतु ही खैरात घेणारे दलाल कोण हे शोधून काढणे व खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:49 pm, January 13, 2025
temperature icon 22°C
साफ आकाश
Humidity 42 %
Wind 13 Km/h
Wind Gust: 22 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!