भुवनेश दुसाने.(पाचोरा)
एका बाजूला जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम व योजना राबवत असतांनाच सद्यस्थितीत दुसरीकडे मात्र महिलांवरील अन्याय, अत्याचार, शोषण, हुंडाबळी, दिवसाढवळ्या अपहरण, सामुहिक अत्याचार, महिलांच्या हत्या या घटनांमध्ये कमालीची वाढ झालेली दिसून येत आहे.
अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत वाईट घटना काही दिवसांपूर्वी धरणगाव शहरात घडली आहे. या घटनेत दोन लहान बालिका एक ८ वर्षीय व दुसरी ६ वर्षीय या दोघ बालकुमारी दळण दळण्यासाठी पिठयाच्या गिरणीवर गेल्या असता, गिरणी मालक वय (६२) वर्षे (ज्याच्या गोवऱ्या म्हसणात) नेण्याचे दिवस जवळ आले आहेत. अशा नराधमाने ज्या लहान, लहान बालिका आपल्या नातवंडांच्या वयाच्या आहेत की ज्यांना अजून जग काय आहे याची अजून पूर्ण जाणीवही झालेली नाही अशा निरागस, कुमारवयीन बालिकांवर एकांताचा फायदा घेऊन गुलाबाच्या फुलासारख्या सुंदर दोघंही बालिकांचा लैगिंक छळ केला. त्यांच्यावर अमानुष अत्याचार केला. त्यांच्या देहाचे लचके तोडले. ही बाब अतिशय संतापजनक असुन दुर्देवी आहे. समाजाला लांच्छानास्पद असुन मानवतेला काळीमा फासणारी आहे.
अशा घटनांना कायमस्वरूपी पायबंद घालण्यासाठी या अत्याचार करण्याऱ्या नराधमास कठोरातील कठोर शिक्षा झालेच पाहिजे. अशा मागणीचे निवेदन युवासेना युवती विस्तारक शिवसेना आघाडीतर्फे डॉ. प्रियंका किशोर पाटील युवासेना (युवती विस्तारक, जळगाव जिल्हा) वैष्णवी खैरनार (पाचोरा शहर अधिकारी.) यशश्री वाघ.(जळगाव शहर समन्वयक.), वैशाली झाल्टे,(जळगाव शहर समन्वयक.), रोहिणी पाटील, अनुष्का बिल्दीकर यांनी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या.श्री.अभिजीज राऊत साहेब व जिल्हा पोलिस अधीक्षक या.श्री.प्रविणजी मुंडे साहेब यांना दिले असून या नराधमाला कठोरात, कठोर शासन न झाल्यास आम्ही युवासेना युवती विस्तारक शिवसेना आघाडीच्या माध्यमाने रस्त्यावर उतरून महाराष्ट्रभरातून तिव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देत होणाऱ्या परिणामांना शासन, प्रशासन जबाबदार राहील असे नमूद केले असून आमच्या भावना शासन दरबारी कळवाव्यात अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.
(आमचा महाराष्ट्र हा आयाबहिणींची अब्रु राखणारा, रक्षण करणारा सन्मान करणारा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. स्त्री वंदनीय, पुजनीय आहे. स्त्री खऱ्या अर्थाने आमच्या मानवजातीचा वंशवेल वाढविणारी पवित्र माता आहे. स्त्री म्हणजे प्रेम, जिव्हाळा, ममता, वात्सल्य याचं मुर्तीमंत रुप आहे. माता, बहिण, सुन, मुलगी, पत्नी अशा पंचलक्ष्मीच्या रुपाने आमच्या घरात व समाजात वावरत असते. अशा या पवित्र स्त्रीचे रक्षण व संरक्षण करण्याची जबाबदारी आम्हा सर्वांची आहे. नारी अबला नाही ती सबला आहे. स्त्री आपल्या कर्तृत्वाचा ठसा सर्वच क्षेत्रात उमटवित आहे. तरी समाजातील राक्षसी प्रवृत्तीचे नराधमांचा अत्याचार सातत्याने चालुच आहे. म्हणुन धरणगाव शहरातील दोन बालिकांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या राक्षसास भरचौकात पावसावर लटकवून खुलेआम शिक्षा झालीच पाहिजे व अशा घटना घडणारच नाहीत याकरिता उपाययोजना झाल्या पाहिजेत तरच जागतिक महिला दिन साजरा करण्यात तथ्य आहे. अशा संतप्त प्रतिक्रिया डॉ. प्रियंका किशोर पाटील युवासेना (युवती विस्तारक, जळगाव जिल्हा) यांनी व्यक्त केल्या.)