चोपडा दि.१५ (प्रतिनिधी/ महेश शिरसाठ ): शरभंग ऋषीपाडा उनपदेव येथे भरला जिल्ह्यातील सर्वात मोठा भोंगऱ्या बाजार : आदिवासी बांधवांनी घेतला मनमुराद आनंद घेतला आहे.
भोंगऱ्या बाजार निमित्ताने ना गुबराव पाटील पालकमंत्री,प्रा चंद्रकांत सोनवणे मा आमदार,सौ लताताई सोनवणे आमदार चोपडा यांनी फोन वर शुभेच्छा दिल्या!!
भोंगऱ्या बाजार चे उद्घाटन सुधीर गडकरी संपर्क प्रमुख, यांचे हस्ते झाले.यावेळी संजीव पांडुरंग शिरसाठ सदस्य संगांयो, राजेंद्र पाटील,ता शिवसेना प्रमुख, सागर ओतारी,सौ भावना माळी सरपंच अडावद,सौ भारती मळी उपसरपंच, नामदेवराव पाटील मा सरपंच प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
चोपडा
सातपुड्यातील दऱ्या खोऱ्यात व डोंगर कपारीत विखुरलेल्या स्वरूपात असणारे आदिवासी बांधव भोंगऱ्या निमित्त अडावद ता. चोपडा येथे एकत्रीत येऊन ढोल व बसुरींच्या मंजुळ आवाजात आदिवासी वेशभूषा करून आबालवृद्धांनी ठेका धरत भोंगऱ्या साजरा केला.
१४ रोजी सातपुड्याच्या कुशीत वसलेले अडावद येथील ऋषीपाडा येथे सकाळपासून अनेक पाड्या वस्त्यांवरून आदिवासी बांधव आपल्या ढोलसह गटागटाने एकत्र येऊन भोंगऱ्या सणाचा आनंद घेतांना दिसला. वर्षभर विखुरलेल्या स्वरूपात असणारा आदीवासी बांधव होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. होळी अगोदर भरणाऱ्या गावांच्या बाजारात भोंगऱ्या बाजार भरतो.
यात वर्षभरासाठी लागणाऱ्या विविध वस्तू आदिवासी बांधव खरेदी करतात त्यात संसारोपयोगी वस्तूंची जास्त खरेदी होते. तसेच फुटाणे, चुरमुरे, दाळ्या, गोडशेव, जलेबी व थंड पेय अशा विविध खाद्य पदार्थ खरेदी करून उत्सव ढोलची अप्रतिम बांधणी भोंगऱ्या बाजारात येणारे ढोल हा त्या गावात सहभागी होणाऱ्या प्रत्येक पाडा वस्तीचे प्रतिनिधित्व करतो म्हणून त्यास मोठा मान असतो हा ढोल संपूर्ण अखंड लाकडाच्या बुंध्यातील मधला गाभा काढून तयार करण्यात येतो त्यावर चामड्या पासून तयार केलेले चगद्या लावल्या जातात दोन्ही चगद्याना दोरीने बांधून एक प्रकारचा ताण देऊन उत्तम ऱ्हिदम येईपर्यंत विशिष्ट ताण दिला जातो त्याचे वजन साधारण ७० ते १०० किलोपर्यंत येते. असा हा ढोल बाजार असल्येल्या गावी आधी त्या गावाचा पाटील ढोल घेऊन उतरतो त्यानंतर तेथे आलेल्या प्रत्येक गावातील ढोल रांगेत उतरतात त्यासोबत थाळीनाद, मांदल (छोटा ढोल) ही वाद्य वाजवून एक विशिष्ट प्रकारचा नाद वाजवला जातो त्या ठेक्यावर आदीवासी बंधू भगिनी ताल धरून सुरेख नृत्य करतात तेव्हाच आनंद विरळाच असतो . या बाजारात खाऱ्या उनपदेव ऋषीपडा , वनगाव पांढरी , शेवरे बु. ईच्छापूर , मेव्या आंबा, विष्णापुर, निशाण्या पानी, घोडचापर, भुरपाडा , मनापुरी, रोशन बर्डी, धवली, बुरपडाव, ताराघाटी, उनपदेव, देवझीरी, बोरमळी, डुकरने, रामजीपाडा, उमर्टि, मुळ्याउतार, चांदण्यातलाव, पान शेवडी, गेरूघाटी, मेलाने, वराड, चहार्डी, चिचअमली, बोरअजंती देवगड, मालापूर, आडगाव, धवली यासह ३७ पाडा वस्त्यांवरील आदिवासी बांधव व मध्यप्रदेशातील गावांमधूनही सहभागी होते. चैतन्य निर्माण करणारा सण भोंगऱ्या आदिवासी बांधवांच्या जीवनात चैतन्य निर्माण करणारा उत्सव आहे याचे जतन व संवर्धन करताना आदिवासी आपणास गाणे , बासरी वाजवणे , धोतर - फेटा असा पेहराव करता येणे ढोल वाजवने, घुंगरू - बासरी व ढोलच्या मंजुळ स्वरांवर स्वार होऊन आदिवासी नृत्य सादर करणे हे तो अनुभवाने शिकत असतो व ही परंपरा आपल्या पुढील पिढीच्या हाती मोठया उत्साहाने सोपवित असतो. दोन वर्षांत पहिल्यांदा होणार भोंगऱ्या दरवर्षी साजरा होणारा भोंगऱ्या कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत साजरा होऊ शकला नाही.
यावर्षी मध्यप्रदेशात भोंगऱ्या बाजाराला बंदी असल्याचे आदिवासींमध्ये बोलले जात आहे. परिणामी महाराष्ट्रात साजरा होणाऱ्या बाजारांत आदिवासी बांधव माध्यप्रदेशातूनही हजेरी असल्याने येथील भोंगऱ्या बाजारांत मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. भोंगऱ्या बाजार शांततेत पार पडवा यासाठी
अडावद पोलिस स्टेशन चे स.पो.निरिक्षक्क किरण दांडगे व कर्मचारी यांनी पोलिस बंदोबस्त चोख ठेवला.
भोगऱ्या बाजार कार्यक्रम साठी देवसिंग पावरा,संजय शिरसाठ, चंद्रशेखर साळुंखे, प्रविण कोळी,प्रमोद बाविस्कर, गुलाब ठाकरे, ताराचंद पाडवी, गणदास बारेला,सौ नायजाबाई पावरा,ताराचंद पाडवी,बिराम बारेला, प्रल्हाद पाडवी,बियानु बारेला,खजान पावरा,खुमसिंग बारेला, खजान पावरा, बाबुराव पाटिल गजिराम पावरा,संजय बारेला, तुकाराम बारेला, प्रमोद बाविस्कर, प्रविण कोळी आदी उपस्थित होते.