( प्रतिनिधी महेश शिरसाठ): चोपडा तालुक्यातील बिडगाव येथे मालमत्ता वाटणीच्या वादातून पतीने विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने पत्नीने संतापाच्या भरात दोन मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्यात खुशी बचावली होती. मात्र, मातृ छत्र हरवल्याने पोरक्या झालेल्या खुशीला पोलिसांनी शालेय साहित्यासह दैनंदिन वापराच्या वस्तू भेट देऊन तिचे सांत्वन केले आहे.
शिरपूर तालुक्यातील मूळ खंबाळा येथील विनोद विक्रम सपकाळे याचे मूळगावी भाऊ व वडिलांशी हिस्से वाटणीवरून हाणामारी झाली होती. विनोद व वर्षा सपकाळे हे खंबाळा येथून दुपारी चोपडा तालुक्यातील बिडगाव येथे घरी परत आले. यानंतर रात्री पती-पत्नीत भांडण झाले. यात विनोदने विष करून प्राशन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पतीने विष प्राशन केल्याच्या संतापात पतीला रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर काही तासांनी वर्षा सपकाळेने यांनी आपल्या दोन्ही मुली किर्ती (वय ८) आणि मोनिका (५) यांना विहिरीत फेकून देत स्वतः उड़ी मारुन आत्महत्या केली होती. सुदैवाने सपकाळे दांपत्याची मोठी मुलगी खुशी आंबापिंप्री (ता. पारोळा) येथे मामाच्या गावी पाचवीत शिकत असल्याने ती बचावली होती. परंतु, मातृ छत्र हरवल्याने पोरक्या झालेल्या खुशीला वडिलांनी सांभाळण्यास नाकारले. त्यामुळे पोलिसांनी शालेय साहित्य, वह्या, पुस्तके, बुट, चप्पल, दोन ड्रेस तसेच दैनंदिन वापराच्या वस्तू भेट देऊन तिचे सांत्वन केले. अडावद पोलिस ठाण्याचे सपोनि किरण दांडगे, कादीर शेख, जयदीप राजपूत, योगेश गोसावी, जगदीश कोळंबे यांनी मदतीचा हात पुढे करत खुशीला मदत केली.