नंदुरबार – रविंद्र गवळे
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व ग्रामविकास संस्थेचे कला महाविद्यालय बामखेडे त.त. यांच्या संयुक्त विद्यमाने रासेयो शिबिर त-हाडी येथे दिनांक २२मार्च ते २८ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला.
या सात दिवशीय शिबिरामध्ये संपूर्ण गावामध्ये साफ स्वच्छता अभियान राबविण्यात आले तसेच गावांमधील प्लास्टिक कचरा साफ करून त्याची योग्य विल्हेवाट लावली, स्वयंसेवकांनी कोविड लसीकरण सर्वे करण्यात आला,तसेच एक मुठ धान्य संकलन या उपक्रमातून संपूर्ण गावातून पाच किंटल धान्य संकलन करण्यात आले. या सदर शिबिरामध्ये आपत्ती व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, मानसिक आरोग्याचे संवर्धन, स्वच्छ भारत अभियान, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, कोरोना मुक्त भारत, भारताच्या स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव, पर्यावरण व संवर्धन, अन्नपदार्थ सुरक्षा जनजागृती, डिजिटल साक्षरता इत्यादी विषयावर तज्ञांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
२८ मार्च रोजी या शिबिराचा समारोप करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष मा.श्री पी.बी.पटेल उपाध्यक्ष मा. श्री डॉ. के.एच.चौधरी ,सचिव मा.श्री बी.व्हि.चौधरी त-हाडी गावाचे
प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ.जयश्री ताई सुनील धनगर श्री.सुदाम नथू भलकार,श्री तुळशीराम भाईदास पाटील, श्री सुनील बुधा धनगर समारोप कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे लाभले होते, या प्रसंगी विविध स्वयंसेवकांनी आलेल्या सात दिवसांमध्ये जो अनुभव आला तो मनोगताच्या माध्यमातून व्यक्त केला यामध्ये
कु.निशा धनगर,यशवंत साळवे,मनोज खोंडे कु.हर्षदा पाटील इत्यादी स्वयंसेवकांनी आलेल्या सात दिवसांमध्ये हृदयस्पर्शी अनुभव आपल्या मनोगतातून व्यक्त केले, मा.श्री तुळशीराम भाईदास पाटील यांनी स्वयंसेवकांना आपण आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता येणाऱ्या समस्यांना तोंड द्यायचे आणि यामधून यशस्वी कसे व्हायचे याविषयी मार्गदर्शन केले, नवीन पिढी जास्तीत जास्त मोबाईलच्या आहारी कशी जात आहे व मोबाईल चे दुष्परिणाम कसे होत आहेत यातून बाहेर पडण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन केले मा.श्री सुदाम नथू भलकार यांनी विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी जास्तीत जास्त परिश्रम घेणे,मेहनत, जिद्द चिकाटी प्रामाणिकपणा, आपल्या अंगी बाळगणे आवश्यक आहे तसेच त्यांनी आदर्श स्वयंसेकासमोर मांडला,कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री पी.बी.पटेल यानी विद्यार्थ्यांना जीवन जगत असतांना संघर्ष कसा करावा या विषयी मार्गदर्शन करतांना विविध उदा.दिली.तसेच संस्थेचे सचिव मा.श्री बी. व्ही.चौधरी यानी विद्यार्थ्याचे आणि गावकऱ्यांचे कौतुक केले.तसेच
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.पी.पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बी.एन.गिरासे यांनी केले. आणि कार्यक्रमाचे प्रस्तावीक व सातदिवसाचा लेखाजोखा सहाय्यक कार्यक्रम आधिकारी डॉ. वाय.सी.गावीत यांनी मांडला. तर आभार प्रगटन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सी.एस.करंके यांनी मानले. याप्रसंगी महिला सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ के .पी.पाटील तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.तसेच गावातील विविध संस्थाचे पदाधिकारी व जि.प.मराठी शाळेचे मुख्याध्यापक आणि त्याचे सहकारी , विविध वृत्तपत्रांचे पत्रकार बंधू , महाविद्यालयातील प्राध्यापक आणि प्राध्यापकेत्तर बंधू उपस्थित होते.