प्रतिनिधी:- राहुल आगळे
जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील शिरस्तेदाराची बनावट सही शिक्का ठोकून व बोगस चलन पावती बनवून खोटे व परस्पर चुकीचे मोजमाप नोंदून जमीन घोटाळा केल्याप्रकरणी नंदुरबार येथील भूमी अभिलेख कार्यालयातील छाननी लिपिक का विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामुळे भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांच्या मार्फत भु माफियांनी येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कारभार ताब्यात घेऊन कसा धुमाकूळ घातला आहे याचे चित्र समोर आले आहे सदरील माहिती अत्यंत खळबळजनक असून जमीन माफियांचे मोठे घोटाळे उघड होण्याची शक्यता यावरून व्यक्त केली जात आहे .तरी सदर प्रकरणाची चौकशी होऊन संबंधितानवर कारवाई होईल का ? हा खरा प्रश्न आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार शेतकरी राजेंद्र दर्यावसिंग रघुवंशी राहणार परदेशीपुरा नंदुरबार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुमिअभिलेख कार्यालय नंदुरबार येथील छाननीलिपिक फारुक शेख निसार पिंजारी यांच्याविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात काल रात्री म्हणजे २४ मार्च २०२२ रोजी १०:वाजून ४८ मिनिटांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा सर्व फसवणुकीचा प्रकार १५ मे २०१९ ते २४ मार्च २०२२ या कालावधीत घडल्याचे नमूद करून राजेंद्र रघुवंशी यांनी फिर्यादीत म्हटले आहे की त्यांचे होळ तर्फे हवेली शिवारात ६६. ६७/ वन व ६८ शेत गट असून ते व त्यांच्या मुलगा हा तिथे शेती करुन कुटुंबीयांच्या उदरनिर्वाह करतो सन २०१४ साली राजेंद्र रघुवंशी यांनी भूमी अभिलेख कार्यालयात नंदुरबार यांच्याकडून शेत गट क्रमांक ६७/ ६८ याची पोस्ट केली होती त्यानुसार त्यांचे क्षेत्र हे ६७ मध्ये बरोबर होते परंतु मुलाच्या नावे असलेले शेत गट क्रमांक ६८ मध्ये त्यांनी रेल्वे लाईन ची जमीन या शेतात दाखविली होती आम्हाला प्राप्त झाल्यावर ती बाब समजली. त्यानंतर मी सन २०१७ मध्ये ६७ /२ची हात कायम मोजणी साठी भूमी अभिलेख कार्यालय येथे अर्ज केला कायदेशीर ३००० हजार रुपयांचे चलन भरले या अर्जानुसार ६७ / २ ची हद्द कायम मोजणी करण्यात आली ती भुकर मापन केंद्र सोनवणे यांनी शेतात येऊन मोजणी केली होती व मला सदर कार्यालयामार्फत टपालाने क प्रत पुरविण्यात आली होती त्यावर मला संशय आल्याने मी शेत मोजमाप करण्यासाठी ऑफिसला गेलो असता फारूक निसार पिंजारी याने सदर चे मोजमाप केले असता माझ्या शेताची पुढील बाजू १८. ६३ मीटर भरत असल्याचे माझ्या लक्षात आले तेव्हा मी त्यांना याबाबत सांगितले असता त्यांनी मान्य केले की चुकून सदरची शीट तयार झाली आहे असे नमूद करून फिर्यादीत रघुवंशी यांनी म्हटले आहे की त्यानंतर दहा दिवसात छाननी लिपिक फारूक निसार पिंजारी यांच्यामार्फत तिने मला सदर शेताची पुन्हा परत टपालाने पुरविण्यात आली खात्री करण्यासाठी खाजगी इंजिनीयरला सदर शीट दाखविली त्यावेळी पुन्हा ती ७० मीटर चीच असल्याचे आढळले परंतु वास्तवात २०१४ क्षेत्राची पुढील सीमा ही ७०. २० मीटर अशी दिसत होती म्हणून आम्ही वेळोवेळी भूमी अभिलेख कार्यालय नंदुरबार येथे या बाबत अर्ज केले परंतु आम्हाला समाधान कारक उत्तर भेटले नाही तरी मी माझ्या प्रयत्न चालूच ठेवला त्यानंतर मी सन २०२१ मध्ये मी व माझ्या मुलगा सदर मोजणी शीट ची क प्रत घेऊन भूमी अभिलेख कार्यालय, नंदुरबार येथे गेलो तेथे हजर असलेल्या शिरस्तेदार सुभाष जगन्नाथ मोरे यांनी सदर मोजणी शीट पाहिली असता त्यांनी त्यावरील शिरस्तेदार म्हणून केलेली सही त्यांची नाहीच असे समजल्या वरून खात्री झाली की फारुख निसार पिंजारी याने आमची फसवणूक केली आहे.आम्हांला बनावट शीट पुरवली आहे. तसेच १५/५
२०१९ रोजी मी शेत गट क्रमांक ६६ शिट क मोजणी साठी येथे अर्ज करण्यासाठी गेलो असता त्यांनी लिपिक फारुख पिंजारी यांनी नेट बंद असल्याचे सांगितले होते तुम्ही माझ्याकडे ६०००/- हजार रुपये देऊन द्या मी चलन भरून घेईल व त्यांची पोच-पावती आपणास घरी येऊन देतो असे सांगितले होते त्यावरून मी लहान मुलगा अभय रघुवंशी यांचे सक्षम त्यास रोख ६०००/- हजार रुपये दिले दोन ते तीन दिवसानंतर त्याने मला एका चलनाची झेरॉक्स प्रत दिली व सांगितले की तुमचे चलन भरण्यात आले आहे वास्तवात त्याने तसे काही केले नव्हते हे नंतर उघड झाले त्यामुळे माहिती अधिकारात चलनाची मागणी केली असता मला लेखी उत्तर दिले नाही जन माहिती अधिकारी दिलीप बाविस्कर यांना याबाबत भेटलो असता त्यांनी तोंडी सांगितले की सदर प्रत रेकॉर्डवर नाही त्यावरून माझी खात्री झाली की फारुख निसार पिंजारी याने स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी चलनाची बनावट प्रत देऊन बनावट सही असलेली मोजणी शीट. पुरविले.या फिर्यादीत वरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाई करण्याच्या दृष्टीने भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ४०९, ४६५, ४६७, ४६८, ४२०, अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील हे अधिक तपास करीत आहेत.