प्रतिनिधी राहुल आगळे
शहादा प्रतिनिधी :- शहादा तालुक्यातील सारंखेडा पोलीस ठाणे तर्फे पोलीस ठाणे हद्दीतील २९ पोलीस पाटलांच्या कोरणा योद्धा म्हणून सत्कार व सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस पाटील संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष सुरेश गिरी गोसावी प्रमुख अतिथी म्हणून सारंखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट जिल्हा पोलिस पाटील संघटनेचे कार्याध्यक्ष गजेंद्र गिरीगोसावी पोलीस निरीक्षक भगवान कोळी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक शिरसाठ म्हणाले की, कोरोणाच्या कठीणकाळात प्रशासनाला खांद्याला खांदा लावून मदत करणारा पोलीस पाटील हा ग्रामीण भागातील महत्त्वाच्या दुवा आहे त्यांची सेवा करताना वेळप्रसंगी ग्रामस्थांनी शब्दिक वादही झाले पण त्यांनी आरोग्य सेवा सुरू ठेवली म्हणून त्यांना सन्मान होणे गरजेचे आहे, सन्मानामुळे त्यांच्या कामाची ऊर्जा वाढेल असे सांगितले पोलीस उपनिरीक्षक कोळी म्हणाले की कोरोना च्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत बाधित रुग्णांना गावातून थेट विलगीकरण कक्षापासून सेंटरमध्ये दाखल करण्यासाठी पोलिस प्रशासनाला आरोग्य विभागाला मदत करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली त्यानंतर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यासाठी पोलिस पाटलांनी विशेष जनजागृती मोहीम राबवून लोकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले ही पोलिस पाटलांची अभिमानाची बाब असून त्यांच्यासाठी प्रशासनाकडून त्यांच्या सत्कार सन्मान करणे हे क्रमप्राप्त आहे सावदा येथील पोलीस पाटील कविता गिरासे यांनी कोरोना काळात काम करताना आपले अनुभव मांडले कार्यक्रमात सारंखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २९ महिला व पुरुष पोलीस पाटलांच्या कोरणा योद्धा म्हणून सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन गजेंद्रगिरी गोसावी यांनी केले. आभार पोलीस पाटील सुरेशगिर गोसावी यांनी मानले.