प्रतिनिधी राहुल आगळे
प्रतिनिधी शाहदा : सध्या मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तीव्र उन्हाळा जाणवत आहे. उन्हामुळे नागरिक हैराण होताना दिसत आहेत. शीतपेय विक्रीची दुकाने असंख्य थाटली गेली आहेत. अशावेळी नागरिकांना पिण्यासाठी पाणी असते. उन्हाळ्यात नागरिकांची तहान भागावी म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून शहरात सेवाभावी संस्था सामाजिक संघटनांनी आवश्यक पक्या पाणपोई उभारल्या आहेत त्या केवळ शोभेसाठी ठरल्या. सर्व पाणपोई बंद आहेत. त्या मृगजळ ठरत आहेत काही टाक्या उद्ध्वस्त झाल्या आहेत सामाजिक सेवाभावी संस्था संघटनांनी शहरात नागरिकांची तहान भागावी, उन्हाळ्यात दिलासा मिळावा हा चांगला दृष्टिकोन त्यांनी खर्च करून चांगल्या स्वरूपाच्या पाण्याच्या टाक्या बांधल्या हे कौतुकास्पद आहे त्यात सातत्य न ठेवता दुर्लक्ष करण्यात आले आहे. गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून कुणीही त्यांच्याकडे घायला तयार नाहीत. धूळखात पडल्या आहेत याची दखल नगरपालिका प्रशासन सेवाभावी संघटना सामाजिक संस्थानी घेणे अपेक्षित आहे शहादा शहरातील जुन्या तहसील कार्यालयात समता जलमंदिर म्हणून पाण्याची टाकी आहे ती पूर्णत: धूळखात पडली आहे. बसस्थानक आवारातील पाण्याची टाकीची नासधूस झाली आहे. वास्तविक बसस्थानकात प्रवाशांना पाण्याची टाकी अत्यंत गरजेची आहे.