विद्यार्थिनी घेतले ग्रामीण जीवनाचे धडे
प्राची पी एल शिरसाट,नागपूर 30/03/2022 : युगांतर शिक्षण संस्था द्वारा संचालित तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय (स्वायत्त संस्था), नागपूर यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे नुकतेच ग्राम.पारडसिंगा तालुका. काटोल,जिल्हा.नागपूर येथे पाच दिवसीय ग्रामीण शिबीर दि २१ मार्च २०२२- २५ मार्च २०२२ या दरम्यान संपन्न झाले…
ग्रामीण शिबिराचे उदघाटन दि. २१ मार्च २०२२ ला पारडसिंगा ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. शुभांगी खरबडे यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्वाती धर्माधिकारी उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ प्राध्यापक डॉ. दीपक मसराम, रासेयो विभागाचे प्रमुख आणि शिबिर प्रमुख प्रा. दिगांबर टुले, डॉ. आर्शिया सय्यद, प्रा. सचिन हुंगे, डॉ. रोशन गजबे, डॉ. प्रकाश पवार, डॉ.अमित गद्रे, प्रा. प्रवीण वसू उपस्थित होते.
या शिबिरात दररोज सकाळी योगा-प्राणायम,सार्वजनिक प्रार्थना, प्रभातफेरी, ग्रामस्वच्छता व श्रमदान ने दिवसाची सुरुवात होत होती.
तर सायंकाळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करून उपस्थित विद्यार्थ्यांचे मने जिंकली. यात सामाजिक विषयावर नाटक, गित सादर केले गेले.
पहिल्या दिवशी बौद्धिक सत्रात महिला सक्षमीकरण या विषयांवर प्रशांत पवार यांनी मार्गदर्शन केले त्यांनी मानवी समाजाचा स्त्रियांकडे बघण्याचा पूर्वीपासून असलेला दृष्टीकोन सांगितला व एखाद्या यशस्वी स्त्रीबद्दल जर वाचन करायचे असले तर त्या स्त्री च्या आयुष्यातील अडचणी सुरुवातीला वाचाव्यात इ.अमूल्य मार्गदर्शन केले.या सत्राचे अध्यक्ष स्थान डॉ. रोशन गजबे यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आर्शिया सय्यद, प्रा. दिगांबर टूले उपस्थित होते.
दुसऱ्या दिवशी रासेयो च्या बौद्धिक सत्राच्या पहिला सत्रात प्रथम शिक्षण फाऊंडेशन या विषयी मार्गदर्शन करण्यासाठी मा.नरेंद्र लांजेवार व मा.प्रमोद घंगारे उपस्थित होते. लांजेवार यांनी प्रथम शिक्षण उपक्रम बद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली व प्रथम शिक्षण उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण शिक्षणासाठी कसे योगदान दिल्या जाते आणि स्वयंसेवक म्हणून बी.एस.डब्ल्यू व एम.एस.डब्ल्यू च्या विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे काम करावं याबद्दल मार्गदर्शन केलं. या सत्राला अध्यक्ष म्हणून प्रा. सचिन हुंगे होते. दुसऱ्या सत्रात भारती तिवारी यांनी महिलांच्या मासिकपाळी या विषयी अमूल्य असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले यामध्ये मासिक पाळी बद्दलच्या समस्या व किशोरावस्थेत येणाऱ्या विविध समस्यांबद्दल मुलींनी बोलतं व्हावं याबद्दल मार्गदर्शन केले. या सत्राला अध्यक्ष म्हणून डॉ. आर्शिया सय्यद उपस्थित होत्या. यावेळी मासिक पाळीच्या संदर्भात ओपिनियन पोलचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले. शिबिराच्या तिसऱ्या दिवशी विद्यार्थीनी महिलांच्या मासिकपाळी आणि आरोग्य स्वच्छता व्यवस्थापन या विषयी मताचे अध्ययन करण्यासाठी पारडसिंगा गावामध्ये सर्वेक्षण केले. सोबतच गावामध्ये ग्रामस्वच्छता करण्यात आली आणि जि. प. शाळेत सामूहिक प्रार्थना घेऊन शाळा परिसर स्वच्छ करण्यात आला. दुपारच्या बौद्धिक सत्रात लघु उद्योग आणि युवकांची भूमिका या विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी मा.योगेश भोसे यांनी प्रश्न उत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या लघुउद्योगासंबंधीत विविध योजनांची माहिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सत्राला अध्यक्ष म्हणून कार्यक्रम अधिकारी प्रा. दिगांबर टूले उपस्थित होते. शिबिराच्या चौथ्या दिवशी ग्रामपंचायत पारडसिंगा येथे पुस्तक भेट म्हणून दिली. त्यानंतर काही विद्यार्थी कोळंबी येथे मासिकपाळी आरोग्य आणि स्वच्छता याबद्दल सर्वेक्षण करण्यासाठी गेले. सोबतच काही विद्यार्थी पारडसिंगा येथे जि. प. शाळेमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने पथनाट्य सादर करुन मंदिर परिसरात श्रमदान करण्यात आले व शेजारीच असलेल्या ग्राम अंबाडा सोनक गावातील लोकांच्या उपजीविकेची मूलभूत माहिती घेण्यासाठी काही विद्यार्थी गेले आणि त्यांनी सर्वेक्षण केले. सायंकाळी समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मा. संजय डोंगरे (प.स सदस्य काटोल) मा.धम्मपाल खोब्रागडे( प स सभापती काटोल),मा. शुभांगी खरबडे (सरपंच पारडसिंगा), श्रीमती पी.पद्मा,मा.योगेश भोसे,डॉ.प्रकाश पवार, डॉ.अमित गद्रे,प्रा.प्रवीण वसू,डॉ.विजय धोटे (प्राचार्य अरविंद देशमुख महाविद्यालय, भारसिंगी) प्रा. नरेश धुर्वे, डॉ. बोंबटकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. दिगांबर टुले(शिबिर प्रमुख), डॉ. आर्शिया सय्यद(रा.से.यो.समन्वयक), प्रा. सचिन हुंगे(शिबिर उपप्रमुख), डॉ. रोशन गजबे(शिबिर समन्वयक),मा.हेमंत खेडीकर,मा.चंद्रशेखर निकोसे,मा.सिद्धार्थ गजबे आणि रा.से.यो.स्वयंसेवक उपस्थित होते.