शासनासह लोकप्रतिनिधींनी मदत करण्याची साद
धुळे- प्रतिनिधी- जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, व मेहनतीच्या बळावर राज्य स्तरावरील कुस्ती स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या वैष्णवी बाला मोरे या दिव्यांग विद्यार्थिनीची ब्राझील डेफ ऑलिंपिक स्पर्धेसाठी स्तुत्य निवड झाली आहे दिल्ली येथे एक महिना प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ब्राझीलयेथे ऑलिंपिक स्पर्धेसाठी रवाना होणार असल्याची माहिती वैष्णवी चे वडील बाला मोरे व आई चंदना बाई मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली
पत्रकार परिषदेच्या वेळी वैष्णवी चे काका सुदाम मोरे प्रभू मोरे उपस्थित होते. कुस्तीशी घनिष्ठ संबंध असलेल्या मोरे कुटुंबीयां मधील वैष्णवी चे आजोबा स्वै. परशुराम मोरे हे देखील नामांकित मल्ल होते कुस्ती खेळाचा वसा आणि वारसा जपण्याचेकाम वैष्णवी करत असल्याने कुटुंबीयांसाठी अभिमानास्पद बाब असल्याच्या भावना वैष्णवी चे उत्कृष्ट मल्ल असलेले काका सुदाम मोरे यांनी व्यक्त केल्या आदिशक्ती श्री एकवीरा देवी मंदिर परिसरात असलेल्या जवाहर कुस्ती स्टेडियम मध्ये वैष्णवीने लहानपणापासूनच कुस्तीचे डाव पाहिले आणि अवगत केले. कालांतराने ज्युदो या आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळात आवड निर्माण झाल्याने वैष्णवीने जुदो खेळासाठी कठोर परिश्रम घेण्यास सुरुवात केली नागपूर, गोंदिया,अमरावती यासारख्या विविध ठिकाणी झालेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये बाजी मारली. या परिश्रमाचे फळ म्हणून महाराष्ट्र स्तरावरील दिव्यांगांच्या ज्युदो स्पर्धेत वैष्णवीने प्रथम क्रमांक पटकावला. आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी ब्राझील येथे डेट ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तीची निवड झाली आहे झाली आहे परंतु जिल्ह्यातील एकाही लोकप्रतिनिधीने भेट घेऊन शाबासकीची थाप दिली नसल्याची खंत वैष्णवीचे वडील बाला मोरे व आई चंदनबाई मोरे यांनी व्यक्त करत धुळेकर जनतेने वैष्णवीच्या विजयासाठी प्रार्थना करावी,शुभ आशीर्वाद द्यावेत असे सांगून अश्रूंना मोकळी वाट करून दिली.
वैष्णवी चे प्राथमिक शिक्षण धुळ्यातील नकाणे रोड वरील रघुनाथ केले वाक श्रवण विद्यालयात पूर्ण झाले असून माध्यमिक शिक्षण महाराणा प्रताप हायस्कूल येथे घेत आहे सध्या वैष्णवीने दहावीचे पेपर दिली आहे एका मासे विक्रेत्याच्या मुलीने जुद्यो खेळात प्राविण्य मिळवून देशाचे नेतृत्व करण्याचे कसब दाखविल्याने क्रीडाक्षेत्रातील मानाचा तुरा खोवण्याचे काम वैष्णवी करणार आहे
ब्राझील डेफ ऑलम्पिकमध्ये निवड झालेल्या वैष्णवी मोरे हिचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार व शुभेच्छा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष मनोज गर्दे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पत्रकार संघाचे सचिव सचिन बागुल, कार्यकारणी सदस्य मोहन मोरे, संतोष ताडे, पवन मराठे, प्रकाश शिरसाठ, सुनील निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
शासनाने मदत करावी
जुदो स्पर्धेसाठी जिवापाड मेहनत घेणाऱ्या वैष्णवी मोरे ही ची आर्थिक परिस्थिती कमजोर असल्याने मदत करावी ज्यामुळे पुढील स्पर्धांसाठी आणखी प्रोत्साहन मिळू शकेल
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
महाराष्ट्र स्तरावर बाजी मारून आलेल्या वैष्णवी मोरे हिला साध्या शुभेच्छा देण्याचे धाडस धुळ्यातील लोकप्रतिनिधीनी केले नाही तर दुर्लक्षच केले. लोकप्रतिनिधींनीही वैष्णवीच्या यासाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा वैष्णवी चे वडील बाला मोरे यांनी व्यक्त केले.