प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार -किराणा मालाच्या उधारीचे पैसे घेऊन येत असतांना मागुन आलेल्या दोन अज्ञात मोटरसायकल स्वाराने दांड्याचा वार करुन व्यापाऱ्याचे ४ लाख ९ ० हजार लंपास केल्याची धक्कादायक घटना अक्कलकुवा शहरा पासुन सुमारे ४ ते ५ किलोमीटर अंतरावर घडली .
या संदर्भात पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , दि . ३ मार्च रोजी रात्री ९ .१५ वाजेच्या सुमारास अक्कलकुवा येथील किराणा व्यापारी महेश परमसुख तंवर हे बुलेट मोटारसायकल ( क्र.एम.एच .३ ९ , ए.एफ .७००१ ) हीच्याने वाण्याविहीर गावातुन विविध ठिकाणा हुन किराणा मालाचे उधारीचे पैसे जमा करुन अक्कलकुवा कडे येत असतांना अंकलेश्वर ब – हाणपुर रस्त्यावरील वाण्याविहीर फाटा ते राजमोही गावाच्या दरम्यान पुलाच्या अलीकडे त्यांचे पाठी मागुन मोटारसायकल ( क्रमांक जी.जे.२६-७५४८ ) किंवा ( जी . जे . २६ – ७३४६ ) हिचे वर अज्ञात दोन इसम आलेत . त्या दोन इसमांपैकी मोटरसायकल वर पाठीमागे बसलेल्या इसमाने त्याच्या हातातील लाकडी दांडा महेश तंवर यांच्या दिशेने फिरवला परंतु महेश तंवर यांनी मागे वाकुन तो हुकवला त्यात महेश तंवर यांचा हात मोटर सायकलच्या हँडल वरुन सुटल्याने मागुन आलेल्या मोटार सायकल वरील इसमाने बुलेट मोटार सायकलच्या हँडलला लावलेली सुमारे ४ लाख ९ ० हजार रुपये रोख रक्कम व उधारी वसुलीचा कागद असलेली रेक्झिनची बँग हिसकावुन पळुन गेले . याप्रकरणी महेश परमसुख तंवर रा . जैन मंदिरा जवळ अक्कलकुवा यांच्या फिर्यादी वरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांविरुद्ध भादंवि कलम
३ ९ २,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन ,
पुढील तपास पोलीस उप निरिक्षक रितेश राऊत करीत आहेत .