प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार – नंदूरबार जिल्हाधिकारी कार्यालया समोर विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे .
नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महसूल कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे . गेल्या दोन वर्षापासून कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पदोन्नतीच्या फाइल्स शासनाने लवकर मार्गी लावाव्यात , नायब तहसीलदार पदावर पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक स्टेट केडर लावलेला निर्णय मागे घ्यावा , सरळ सेवा भरतीचे प्रमाण 33 टक्के वरून 20 टक्के करावे , महाराष्ट्रातील प्रलंबित महसूल सहाय्यकाची रिक्त पदे त्वरित भरावीत अशा प्रमुख मागण्यांसाठी नंदुरबार जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे . राज्य शासनाने महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या कडे दुर्लक्ष केल्यास बेमुदत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा महसूल कर्मचाऱ्यांनी दिला आहे .
या वेळी उपस्थित महसूल कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाविरुद्ध जोरदार घोषणा बाजी केली .