प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार – राणीपुर , ता . शहादा येथे पत्नी कडून पैसे मागण्याच्या कारणा वरून दोघात भांडण झाल्याने पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी कुस्सा मारून राहत्या घरात गंभीर जखमी करून जीवे ठार मारल्याची घटना घडली आहे .
या बाबत म्हसावद पोलीसात पती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे .
या बाबत पोलीस सुत्रानुसार माहीती अशी की , मंगळवारी पहाटे पाच वाजे पूर्वी राणीपुर ता . शहादा येथे मुन्ना जुगला पावरा ( 28 ) याने त्याची पत्नी रमीला ( 28 ) हिच्या कडून पैसे मागीतले.या कारणा वरून दोघा पती – पत्नी जोरदार भांडण झाले . यात मुन्ना याने रमीला च्या डोक्यात लोखंडी कुश्श्याने मारून गंभीर जखमी केले .
यात रमीला चा जागीच मृत्यू झाला .
याबाबत म्हसावद पोलीसात संजय रोहीदास पटले रा.तुळाजा , ता . तळोदा यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार भादंवी कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे . संशयित आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे . राणीपूर गावात तणावाचे वातावरण झाले . म्हसावद पोलीसांची दंगा नियंत्रण पथक गाडीसह पोलीस कर्मचारी बंदोबस्त ठेवला आहे .
गावात तणावपूर्ण शांतता आहे . घटनास्थळी शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे , म्हसावद चे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार ,
तळोदयाचे पोलीस निरीक्षक केलसिंग पावरा यांनी भेट दिली .