प्रतिनिधी प्रविण चव्हाण
नंदुरबार -शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावर जवळील मंगलमूर्ती नगरात झुला खेळत असताना दोरीत अडकून ९ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली .
याप्र करणी शहादा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या घटनेमुळे शहादा शहरात खळबळ उडाली आहे . शहाद्यातील राजेन्द्र मिहीलाल अग्रवाल यांचा चुलत भाऊ मुनेश लखमीचंद अग्रवाल रा . कृष्णकुंज कॉलनी यांना ईशान व रवींद्र असे दोन मुले असून ते विभक्त राहतात . ईशान यास एक यश मुलगा व एक मुलगी आहेत . चुलत भावाची मुलगी सलोनी हिस मुलगी झाल्यानें तिला पाहण्यासाठी मूनेश अग्रवाल यांच्या कडे गेले होते . कार्यक्रम सूरू असताना काल सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पुतण्या ईशान मुनेश अग्रवालयांचा मुलगा यश मुनेश अग्रवाल ( वय ९ वर्ष ) हा भाऊ मुनेश अग्रवाल यांच्या घराच्या मागील बाजूस मोकळ्या जागेत बांधण्यात आलेल्या झोक्यावर झोका घेत असताना झोका गोल गोल फिरवत होता . तेव्हा अचानक घरकाम करणाऱ्या बाईचे लक्ष गेले त्यावेळी . यश खाली पडलेला दिसला तिने घरातील लोकांना याची कल्पना दिली . लागलीच घरची सर्व मंडळी धावून गेल्या नंतर त्याच्या मानेवर झोक्याचा दोरीचा गळफास लागलेला दिसला तो लागलेला गळफास त्यांनी काढून टाकला तेव्हा यश बेशुद्ध अवस्थेत होता . त्याला लागलीच कुलकर्णी हॉस्पिटल येथे दाखल केले . तेव्हा डॉ . मालविका कुलकर्णी यांनी उपचार सुरू केला . परंतू उपचार सुरू असताना तो मरण पावला असे डॉ मालविका कुलकर्णी यांनीसांगितले .
या घटने बाबत शहादा पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली माहिती दिल्यानंतर शाखा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे ,
या प्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .
याबाबत घटनेचा पुढील तपास शहादा पोलीस करीत आहेत .