नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

शहाद्यातील ऑईल मिल मधील स्पेअरपार्ट चोरट्यांना २४ तासात केले जेरबंद , दोन लाखांचा मुद्देमाल जप्त…..

प्रतिनिधी
प्रविण चव्हाण

नंदुरबार – शहादा येथील ऑईल मिल मधील मशनरी स्पेअर पार्टसचे चोरट्यांना २४ तासात एक लाख ८३ हजार ७०० रुपये किमतीच्या मुद्देमालासह दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे .
या बाबत अधिक माहिती अशी कि , दि . ३ ते ४ एप्रिल दरम्यान पंकज सुरेश जैन रा . श्रीराम कॉलनी , शहादा त यांचे शहादा शहारातील खेतीया रोड जवळील त्यांच्या मालकीचे नाकोडा ऑईल मिल येथुन फिर्यादी यांची एकुण ४ लाख ९ ५ हजार रुपये किंमतीचा ऑईल मिलचा मशनरी स्पेअर पार्टस मुद्देमाल अज्ञात चोरटयाने चोरुन नेला होता.
त्या वरुन शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता .
जिल्ह्यात घरफोडीचे वाढते प्रमाण पहाता प्रभारी पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी सदर गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना समांतर तपास करुन गुन्हा तात्काळ उघडकीसआणण्याचे निर्देश दिले होते . त्याअनुषंगाने सदर गुन्हयाचा समांतर तपास सुरु असतांना पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की , वरील गुन्हा हा शहादा शहरातील संशयीत आरोपी अरमान मुख्तार शेख , शोएब शकील बागवान , इम्रान ऊर्फ ईमु लंगड्या शहा यांनी केला असुन ते सदर चोरी केलेला मुद्देमाल ते गरीब नवाज कॉलनी भागात विक्री करण्याचे बेतात आहे . अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोनि श्री . कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे १ पथक तयार करुन तात्काळ शहादा येथे रवाना केले.स्थागुशाचे पथकाने शहादा शहरातील गरीब नवाज कॉलनी भागात दोन संशयीत अरमान मुख्तार शेख रा . रहिम नगर , गरीब नवाज कॉलनी , शहादा ,शोएब शकील बागवान रा . इक्बाल चौक टाऊन हॉल समोर , शहादा यांना ताब्यात घेत विश्वासात घेवुन वरील गुन्हया बाबत विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हा त्यांचा साथीदार इम्रान ऊर्फ ईमु लंगड्या शहा रा . गरीब नवाज कॉलनी , शहादा याच्यासह केला असल्याची कबुली दिली . पथकाने अरमान मुख्तार शेख याच्याकडुन ८० हजार रु . किं . च्या एकुण ४ इलेक्ट्रीक मोटार तिच्यावर कंपनीचे नावाची प्लेट नसलेली एका मोटारीची किंमत २० हजार रुपये प्रमाणे , १० हजार रु . किं . च्या . एकुण २ इलेक्ट्रीक मोटारीचे बाहेरील लोखंडी आवरण असलेली बॉडी त्यात तांब्याची तार नसलेली , ७ हजार ७०० रु . किं.ची एकुण ११ किलो तांब्याची तार प्रति किलो ७०० रुपये प्रमाणे हस्तगत केले .
शोएब शकील बागवान याच्याकडून प्लास्टीकच्या गोणीत २० हजाराच्या २ इलेक्ट्रीक मोटार , १६ हजाराची ४० फुट कॉपर केबल , गुन्हयात वापरलेली ५० हजाराची रु . किं.ची मोटार सायकल ( क्र.एम.एच .१ ९ , एस . ८५०३ ) असा असा एकूण १ लाख ८३ हजार ७०० यांच्याकडुन हस्तगत करुन दोन्ही आरोपींना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे .
सदर ची कामगिरी पोलीस अधिक्षक पी . आर . पाटील , अपर पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पाटील , पोना गोपाल हिम्मत चौधरी , पुरुषोत्तम खिमलाल सोनार , विकास हिम्मत कापुरे , पोशि यशोदिप गोपाळ ओगले चापोना रमेश साळुंखे ,
यांचे पथकाने केली असुन मुद्देमालासह आरोपी अटक करुन २४ तासाचे आत गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल प्रभारी पोलीस अधीक्षक , नंदुरबार विजय पवार यांनी संपुर्ण पथकाचे विशेष अभिनंदन केले आहे .

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
12:20 pm, January 13, 2025
temperature icon 25°C
साफ आकाश
Humidity 36 %
Wind 10 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!