देगलूर, नांदेड : पोलीस विभागातील सर्व पोलीस बांधव जनतेच्या सुरक्षिततेसाठी सातत्याने आपले कर्तव्य बजावित असतात. दिवाळी आली पोलीस, होळी आली पोलीस, ईद आली पोलीस, राजकीय नेते आले पोलीस, हत्या झाली पोलीस, भांडण झाले पोलीस, अपघात झाला पोलीस, मतदान प्रक्रिया पोलीस, चोरी झाली पोलीस, मारामारी झाली पोलीस अशा विविध ठिकाणी पोलिसांना आपले कर्तव्य बजावावे लागते. काहीवेळा स्वतःच्या कुटुंबांसाठीही वेळ देता येत नाही. म्हणून पोलिसांच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली मा मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना उपजिल्हाधिकारी कार्यालय, देगलूर यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे देगलूर तालुका अध्यक्ष सुनील मदनूरे, तालुका संघटक मारोती देगावकर, मनोज बिरादार, तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत गज्जलवार, तालुका सचिव संतोष मनधरणे, तालुका कोषाध्यक्ष ईश्वर देशमुख, देगलूर शहर अध्यक्ष उमाकांत कोकणे, अनिल पवार, दादाराव वेळीकर, मल्लिकार्जुन कडलवार, अमित पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड व जिल्हा संपर्क प्रमुख विशाल पवार यांच्या नेतृत्वाखाली देगलूर तालुका अध्यक्ष सुनील मदनुरे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील तमाम पोलीस बांधवांच्या विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. मागण्या अशा : पोलिसांना सुंदर कॉर्टर बनवून देणे, पोलिसांना टी. ए. वाढवून देणे, पोलिसांची ड्युटी आठ तास करणे, पोलीस कर्मचाऱ्यांना पगार वाढवून देणे, एखादा पोलिस कर्मचारी ड्युटीवर शहीद झाला तर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करणे व त्यांच्या वारसाला तात्काळ नोकरीत समाविष्ट करणे, पोलीस कर्मचाऱ्यांना २००५ पासून बंद झालेले पेन्शन पूर्ववत करणे, महाराष्ट्रातील पोलीस ठाणेमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे, पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांना पोलीस नोकरी मध्ये पाच टक्के आरक्षण देणे अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.