नांदेड जिल्हा प्रतिनिधी – लालाजी इमनेलू
धर्माबाद :- छत्रपती महाराज मराठा साम्राज्याचे संस्थापक, ज्यांच्या कीर्तीचा, शौर्याचा डंका आजही चहूदिशांत घुमत आहे. प्रत्येक मराठी व्यक्तीसाठी शिवाजी महाराज हे नाव नसून ती एक भावना आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने शिवजयंती हि वर्षातून दोन वेळा साजरी होते. एकदा तारखेनुसार, तर एकदा तिथीनुसार. तारखेनुसार दरवर्षी १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली जाते. मात्र तिथीनुसार साजरी केली जाणारी शिवजयंती दरवर्षी वेगवेगळ्या तारखेला येते. यंदा तिथीनुसार २१ मार्च रोजी शिवजयंती साजरी करण्यात आली
शिवजयंती म्हणजे महाराष्ट्रासाठी एका उत्सवाप्रमाणे आहे. पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ रोजी जिजाईच्या पोटी, शिवनेरी गडावर महाराजांचा जन्म झाला. या देशाला अनेक राजे-महाराजे लाभले परंतु रयतेचा राजा कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज. महाराजांनी जात-पात सोडून अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन साम्राज्य उभे केले. ते नेहमी जिद्दीने, चातुर्याने आणि निर्भिडपणे शत्रूला सामोरे गेले. राज्याला लाभलेले अभेद्य किल्ल्याने वैभव आणि समुद्रातील आरमार ही महाराजांचीच देण होय.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवजयंती तिथीनुसार साजरी करण्याच्या केलेल्या घोषणेनुसार आज मनसेच्या वतीने धर्माबाद मध्ये शिवजयंतीची धूम धडाक्यात साजरी करण्यात आली आहे. मनसे नेते तालुकाध्यक्ष दत्तात्रय कावडे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी मनसे सैनिक यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार हे धर्माबाद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माधव वाडेकर साहेब यांच्या हास्ते अर्पण करण्यात आले.यावेळी मनसे शहराध्यक्ष सचिन चाकरोड, सुगत पैलवान, गजानन मुदेवाड , शिवराज भाऊ मोकलीकर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, मारोती पाटील कागेरू पंचायत समिती सभापती, शिवसेना तालुका संघटक गणेश गिरी, साईनाथ पाटील कदम, गौराजी विभुते शिवसेना माजी शहरप्रमुख राजू श्रीरामणे, छावा तालुकाध्यक्ष शिवराज पाटील चोळाखेकर पत्रकार महेश जोशी, गजानन चंदापूरे,भगवान कांबळे पोलिस कर्मचारी सह अनेक शिवप्रेमी मावळे सह अनेक जन उपस्थित होते कार्यक्रम मनसेच्या वतीने आयोजित करण्यात आले होते .