नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

————@ लेख @———-

बाप प्रत्येक आई आपल्या बाळाला जन्म देत असते. त्याच्या पालनपोषणाची जबाबदारी स्विकारत असते. परंतू जेव्हा ती त्या बाळाला सोडून जाते.. तेव्हा त्या बाळाचा कोणताच दोष नसतो. परंतू तरीही त्या बाळाला दोषी समजलं जातं. मोहिनी नावाची ती मेव्हणी. त्या मोहिणीनं उत्कर्षा नावाच्या आपल्या मुलीला जन्म दिला आणि ती मोकळी झाली. त्यातच ती मुलगी आपल्या मोठ्या बापाकडं राहू लागली. मोठा बाप तिला लहानाचा मोठा करु लागला. उत्कर्षा........ती लहान होती. तेव्हापासूनच त्या उत्कर्षावरुन भले मोठे वाद होत. त्या वादातून तिचा मोठा बाप म्हणत असे की मोहिनीनं उत्कर्षाला न्यावं. परंतू तिची मोठी बहिण उत्कर्षाला पाठवायला तयार नव्हती. त्याचं कारण होतं मोहिनीचा विवाह. उत्कर्षाचा बाप मरताच मोहिनीनं एका बदमाश व्यक्तीसोबत विवाह केला होता. जो विवाह तिच्या मोठ्या बहिणीलाच नाही तर तिच्या जिजूलाही पसंत नव्हता. त्यांना वाटत होते की उत्कर्षा वयात येताच तिचा तो नवीन बदमाश पती तिला विकून टाकेल. परंतू तिच्या आईला त्याची लेनदेन नव्हती. तिची आई तर स्वतः म्हणत होती की माझी मुलगी मला द्यावी. मी तिचे जीवन बरबाद करो की काहीही करो. ती माझी मुलगी आहे. मी तुमची तक्रार पोलिस स्टेशनला देईल. नेहमीच्या या गोष्टी. त्यात मुलीचा दोष नव्हता. मोहिनी अगदी आनंदित होती. मात्र मोहिनी व उत्कर्षावरुन उत्कर्षाच्या मोठ्या बापाकडेच वाद होत असत. उत्कर्षाच्या मोठ्या बापाचं नाव आनंद होतं. त्याचं नाव आनंद जरी असलं तरी त्याच्या घरी आनंद नव्हता. तो दुःखी होता. एवढा दुःखी की कोणी कल्पनाही करु शकत नसेल. आनंद आपलं दुःख लोकांना सांगायचा. काही लोकं त्याचं दुःख ऐकायचे. काही लोक ते दुःख ऐकताच त्याला साांत्वना द्यायचे. काही लोकं भडकवायचे तर काही काही मजाही घेत असत. तशी ती चर्चा हळूहळू त्याच्या कार्यालयात गेली. तशी एक महिला म्हणाली, "सर, आपण तिच्यात आणि आपल्या मुलीत थोडासा भेदभाव करा. जेणेकरुन तुमची पत्नी तिला मोहिणीला देवून टाकेल. तुमचं घर डिस्टर्ब झालं आहे. ती आनंदात आहे आणि तुम्ही आपलं जीवन दुःखात का काढावे." आनंदानं होकार तर दिला. परंतू तो उत्कर्षा आणि आपली मुलगी यात भेदभाव कसा करणार! तोही तिला मुलगीच मानत होता. स्वतःच्या मुलीएवढेच प्रेम तिलाही देत होता. त्यानं आतापर्यंतच्या काळात उत्कर्षाला कधी अंतर दिलं नाही. अगदी अंगाखांद्यावर खेळवलं होेतं तिला. मग तो भेदभाव कसा करणाार. तसा त्यांच्या घरच्या भांडणात उत्कर्षाचा कोणता दोष? दोष होता तिच्या आईचा. तिनंच आपले जीवन सावरण्यासाठी पती केले होते. परंतू तिच्या विवाहात त्या लहानग्या बाळाची इच्छा नसल्यानं तिचे पती टिकत नव्हते. ती प्रेमाच्या मागं धावत होती. परंतू प्रेम तिला मिळत नव्हते. खरे प्रेम त्या मुलीत होते. तिच्या पती करण्यात नव्हते. परंतू ती तिला सांभाळण्याऐवजी ती पती करीत सुटली होती. काही लोकं म्हणत होते की असा भांडण करीत करीत सांभाळ कोणीच करु शकत नाही. परंतू आपण सांभाळ करता आहात ही एक आनंदाची गोष्ट असून आपणाला याचा आशिर्वादच लागेल. परंतू काही लोकं म्हणत होते की असे म्हणणा-याला आपण म्हणा की काही दिवस या मुलीला आपल्या घरी घेवून जा. तिची थोडी सेवा करा व आपल्याला जे काही पुण्य मिळेल. त्याचे भागीदार बना. ते लोकांचे बोल. ते ऐकले की आनंदच्या मनात विचारांची कालवाकालव व्हायची व ती गोष्ट घरी काढताच त्याची पत्नी व त्याच्यात भांडण व्हायचं व पुन्हा आनंद दुःखी व्हायचा. तसा आपल्या मेव्हणीबाबत विचार करायचा. परंतू ती याचा विचार करीत नव्हती. ती तर मुलीच्या जबाबदारीतून मोकळी होवून रंगरलिया मनवीत सुटली होती. तिला परीवारांची आठवण येत नव्हती. तसेच तिच्या मुलीचीही. तसेच तिच्या मुलीवरुन घरात भांडण होत असलं तरी तिची मुलगी नाबालिग होती. तिला आपले बडे पप्पा का भांडण करतात तेही कळत नव्हते. महत्वपूर्ण गोष्ट ही की आनंदचं घर डिस्टर्ब असलं आणि लोकंही त्याला चांगलं वाईट या दोन्ही गोष्टी शिकवीत असले तरी त्या चांगल्या वाईट गोष्टीचं पालन करायचं हे त्याचं त्यालाच माहित होतं. तसा तो विचार करीत होता चांगल्या मतानं. काही लोकं सांगतही होते की उत्कर्षाही चांगली निघणार नाही. कारण तिची आईच बदमाश आहे. परंतू ते उद्याचं भविष्य होतं आणि उद्याच्या भविष्यासाठी आनंद आजचं वर्तमान खराब करु पाहात नव्हता. ती मुलगी कशीही का निघेना, आनंद त्या मुलीबाबत चांगलेच विचार करीत होता. जरी त्याची भांडणं त्याच्या पत्नीसोबत झाली, तरी त्यानं कधी मुलीशी भांडणं केली नव्हती. जरी लोकं त्याची मुलगी व उत्कर्षा यात भेदभाव करायला लावत असतील, तरी त्यानं कधी त्या दोघीत भेदभाव केला नाही. आज आनंद म्हातारा झाला होता. त्याची मेव्हणीही म्हातारी झाली होती. तिचा शेवटचा पती तिला म्हातारणातही दुःख देत होता. तो म्हातारपणातही तिला मारत होता. त्यानं तिच्याचसमोर दुसरी पत्नी केली होती. त्यामुळं तो तिला प्रेम देत नव्हता. आताही तिला उत्कर्षाची आठवण येत होती. परंतू उत्कर्षा काही तिच्याजवळ जायला तयार नव्हती. मात्र ती आज आनंदच्या मुलीपेक्षाही जास्त आनंदला जपत होती. आनंदनं जे काही उत्कर्षासाठी केलं होतं. आज तिच उत्कर्षा व्याजासह त्याची सेवा करुन त्याचे ऋण खंडवीत होती. एक दुरचा बाप असला तरी त्याला सख्खा बाप मानत होती.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
2:12 pm, January 13, 2025
temperature icon 27°C
साफ आकाश
Humidity 33 %
Wind 11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!