प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार -तळोदा शहरातील दावलशा बाबा मुलींच्या बालगृहातून तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण केल्या प्रकरणी तळोदा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , तळोदा शहरात दावलशा बाबा मुलींचे बालगृह आहे . सदर बालगृहातून अज्ञाताने फूस लावून काही तरी आमीष दाखवून तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण केले आहे . सदरच्या घटनेने खळबळ माजली आहे . अपहृत मुलींमध्ये एका ११ वर्षीय , १३ वर्षीय व १७ वर्षीय मुलीचा समावेश आहे .
या बाबत बालगृह अधिक्षिका मनिषा किसन गावित यांच्या फिर्यादी वरुन तळोदा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध भादंवि कलम ३६३ प्रमाणेगुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक प्रिया वसावे करीत आहेत .