प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार – नंदूरबार तालुक्यातील मालपूर येथे दुचाकी हळू चालव असे सांगितल्याच्या रागातून दोन गटात वाद निर्माण होऊन मारहाणीत झाली यात दोन्ही गटातील सात जणांना दुखापत झाली असून परस्पर फिर्यादीतून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या बाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , नंदुरबार तालुक्यातील मालपूर ( कुंभारपाडा ) येथील चंद्रसिंग गावित यांच्या घरा समोरील रस्त्यावर जानेश विनोद वळवी हे उभे असतांना विश्वास रामसिंग वळवी हा त्याच्या ताब्यातील दुचाकी जोरात चालवून घेवून गेला . जानेश वळवी याने दुचाकी हळू चालव असे सांगितले . याचा राग आल्याने जानेश वळवी यांना विश्वास वळवी याने काठीने मारहाण केली . सदर भांडण सोडविण्यासाठी जानेश वळवी यांचे वडील मगन वळवी , आई कौशल्याबाई व आत्या शकीलाबाई या आल्या असता त्यांनाही रामसिंग धर्मा वळवी , गुनाबाई विश्वास वळवी व अंजनाबाई वळवी यांनी मारहाण केली . तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली .
या बाबत जानेश वळवी यांच्या फिर्यादी वरुन उपनगर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध भादंवि कलम ३२४ , ३२३ , ५०४ , ५०६ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक केशव गावित करीत आहेत . तसेच विश्वास रामसिंग वळवी यांनी दिलेल्या परस्पर फिर्यादीत म्हटले आहे की , दुचाकी जोरात आहेत . का चालवितो असे विचारल्याच्या राग आल्याने अनुप लक्ष्मण वळवी याने रामसिंग वळवी यांना काठीने डोक्यावर मारुन दुखापत केली . दीपक लक्ष्मण वळवी याने काठीने विष्णू रामसिंग वळवी यांना काठीने मारहाण केली . अजय मोहन वळवी याने गुंताबई विश्वास वळवी यांना लाकडी दांड्याने डोक्यावर मारुन दुखापत केली . तसेच विश्वास वळवी यांना काठीने मारुन डोके फोडले .
याबाबत विश्वास वळवी यांच्या फिर्यादी वरुन उपनगर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध भादंवि कलम ३२४ , ३२३ , ५०४ , ५०६ , २३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वंतू गावित करीत आहेत .