गेल्या वर्षभरापासून परिसरातील तिसरी घटना ; पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह?
नंदुरबार प्रतिनिधी – रविंद्र गवळे
वडाळी (ता.शहादा) येथे सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकळ घालत चार दुकाने फोडत एक मोबाईल दुकानासह अन्य दुकाने फोडल्याची घटना समोर आली आहे. शटरचा मधला भाग वर करुन जॅकच्या सहाय्याने तोडून दुकानात प्रवेश करुन ह्या चोऱ्या केल्या असल्याचे दिसुन येत आहे. यामुळे व्यापाऱ्यांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाचा धाक राहिला नसल्याने अशा घटना घडत असल्याचे व्यापारीवर्गात बोलले जात आहेत. गेल्या वर्षभरापासून वडाळीसह परिसरात चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे.त्यात मोटार सायकल, शेतीउपयुक्त साहिते,मोबाईल,केबल
मात्र पोलिस प्रशासनाकडुन चोरट्यांना धाक बसेल अशी कोणतीच कार्यवाही होत नाही. यामुळे चोरटे येतात आणी चोऱ्या करुन पोलीसांना आवाहन देवून जातात.पोलीस पंचनामा करुन आपले काम पुर्ण करतात.तपास मात्र वाऱ्यावर असतो. यामुळे परिसरात वारंवार चोरीच्या घटना घडत आहेत.गत वर्षी कोंढावळ येथे लाखोंची चोरी झाली होती.त्या चोरीचा अजूनही तपास लागला नाही. तोच पोलिसांपुढे हे नवे आव्हान उभे राहिले आहे. सोमवारी झालेल्या चोरीच्या घटना यातीलच प्रकार असल्याचे गावभर चर्चा रंगुन आहे. वडाळी गावातील मेन रस्त्यावरती असलेले चैतन्य ज्वेलर्स आणि त्या समोरील अंबिका क्लॉथ टोअर्स त्यालाच लागुन असलेले शिवकृपा इलेक्ट्रिक, स्वामी मोबाईल शॉप या दुकानाच्या शेटरला वरती करुन जॅकच्या सहाय्याने तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश करुन येथील एक लाख 227 रु किंमतीचे 21 मोबाईल फोन व 25,000 हजार रोख असा एकुण एक लाख सत्तावीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. तर सराफ दुकानाचे वीस हजार रक्कमेचे चांदीचे दागीने , कापड दुकानातून दहा ते बारा साड्यांचे बॉक्स व इतर कपडे बारा हजार रुपये, शिवकृपा इलेक्ट्रिक या दुकानाच्या गल्ल्यातून एक हजार रुपये रोख असा अंदाजे दीड ते पावणेदोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला असल्याचे समजते. एकाच रात्री चार ठिकाणी चोरट्यांनी चोऱ्या केल्या असल्याने व्यापाऱ्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.तर झालेल्या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले असता काहीही हाती लागले नाही. मात्र ह्या चोरट्यांचा तपास पोलिस कधी लावणार? असा प्रश्न व्यापारी करीत आहेत. सदर घटनेचा तपास सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ करत आहेत.
उपविभागीय अधिकारी श्रीकांत घुंमरे यांची घटनास्थळी भेट
घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी श्रीकांत घुमरे, सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ, विजय गावित सह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथकाने भेट देत घटनेची माहिती जाणून घेत तपासाला सुरुवात केली आहे. पोलीस मुख्य बाजारपेठेतील सी सी टीव्ही कॅमेरे यांचे फुटेज तपासणी करण्यात आली आहेत. काहीही निष्पन्न झाले नाही. एकाच रात्री चार ठिकाणी चोरट्यांनी चो-या केल्या असल्याने व्यापा-यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर झालेल्या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले असता काहीही हाती लागले नाही. मात्र ह्या चोरट्यांचा तपास पोलिस कधी लावणार ? का असा प्रश्न व्यापारी करीत आहेत.
स्वामी समर्थ केंद्रातील मुलांमुळे चोरीचा डाव फसला
वडाळी येथील काही तरुण स्वामी समर्थांचे सेवेकरी आहेत ते रात्री उशिरापर्यंत शहादा येथे स्वामी समर्थ सेवा केंद्रात कार्यक्रमानिमित्त गेले होते, परतत असताना काही लोक दुकानांची शटर उघडत असल्याने पाहिले असता चोर पसार झाले. यामुळे चोरीचा डाव फसल्याची चर्चा आहे.