नंदुरबार- रवींद्र गवळे
सोशल मीडियावरील व्हाट्सअपवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवणे दोघांना चांगलेच महागात पडले आहे. दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असे व्हिडिओ व्हाट्सअप स्टेटस ठेवल्याप्रकरणी नंदुरबार शहरातील दोन जणांविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.नंदुरबार शहर पोलीस सोशल मीडियावर नजर ठेवून आहेत. व्हाट्सअपसह विविध सोशल मीडियावर स्टेटसवर आक्षेपार्ह मजकूर व पोस्ट ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. नंदुरबार शहरातील दोन जणांना व्हाट्सएपच्या स्टेटस वर आक्षेपार्ह पोस्ट ठेवणे चांगलेच महागात पडले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. नंदुरबार येथील बंधाराहट्टी परिसरात राहणारे विष्णू कथु पवार, आनंद अशोक ठाकरे या दोघांनी आपल्या मोबाईलच्या व्हाट्सअप स्टेटसवर दोन समाजात तेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह पोस्ट असलेले स्टेटस ठेवल्याचे आढळून आले. याबाबत पोका.शैलेंद्र दंगल माळी यांनी पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्या मार्गदर्शनानुसार नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विष्णू कथु पवार, आनंद अशोक ठाकरे या दोघांविरुद्ध भादवि कलम १५३ (अ) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.