प्रतिनिधी – रमजान मुलानी
सांगलीतील स्वरूप टॉकीज परिसरातील एका महिलेवर शरीर संबंधास नकार दिल्याच्या रागातून एका युवकाने खुनी हल्ला केला. पीडित महिलेने याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. संकेत राजगोंडा पाटील (वय 19, रा. वसगडे, ता.पलूस, जि. सांगली) असे सदर तरुणाचे नाव असून त्यास विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. सदरची घटना सोमवारी रात्री घडली. अधिक माहिती अशी की, सांगलीतील स्वरूप टॉकीज परिसरातील एका महिलेची आरोपी संकेत पाटील याच्याशी तोंड ओळख होती. काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये जवळीक वाढत चालली होती. मात्र या मैत्रीचा गैरफायदा घेण्याच्या दृष्टीने तरुणाने सदर महिलेशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न केला. सोमवारी रात्री संकेतने सदर महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली. मात्र महिलेने त्यास विरोध करत घरातून जाण्यास सांगितले. शरीर सुखास नकार देत असल्याने संकेतने जवळील चाकू महिलेवर उगारत हातावर, पायावर व मानेवर वार केले. महिलेच्या शरीरातून रक्तस्त्राव होत असल्याचे पाहून युवकाने तेथून पळ काढला. परिसरातील नागरिकांनी सदर महिलेस रुग्णालयात दाखल केले.
पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून विश्रामबाग पोलिसांनी संकेत पाटील यास अटक केली आहे. सदरची कारवाई ही विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी यांचे सुचनेप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील अधिकारी सपोनि अमितकुमार पाटील, सपोफौ अनिल ऐनापुरे, दरिबा बंडगर, संदिप घस्ते, ऋतुराज होळकर यांनी केली. पुढील तपास अनिल ऐनापुरे करीत आहेत.