प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार – नवापूर तालुक्यातील करंजी ओवरा पुलावर विना परवाना देशी विदेशी दारु वाहतुक करणाऱ्या गाडीसह १ लाख ८५ हजार ४२० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला .
याप्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलीस सुद्धांनी दिलेल्या माहितीनुसार , १० मे रोजी दुपारी १ वाजता नवापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांना गुप्त माहीती वरुन करंजी ओवरा पुलावर सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ , पो हे का पंकज सुर्यवंशी , विकी वाघ यांनी सापळा रचला असता . संशयीत आरोपी गणेश सिंगा गावीत रा . लक्कडकोट ता . नवापुर , व सलमान विजय वळवी रा . खोकारवाडा ता . नवापुर हे त्यांच्या ताब्यातील मारुती सुझुकी कंपनीची कार ( क्र . जी.जे .१ ९ , ए . A १४ ९ १ ) हिच्यात विना परवाना देशी विदेशी दारु वाहतुक करतांना आढळुन आला . पोलीसांनी गाडी तपासली असता त्यात एकुण १ लाख ५ हजार ४२० रुपये किमंतीचा मुद्देमाल यासह ८० हजाराची गाडी असा एकुन १ लाख ८५ हजार ४२० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला .
याप्रकरणी भादवि कायदा कलम ६५ ( ई ) , १०८ प्रमाणे कायदेशिर फिर्याद देण्यात आली आहे .
पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक निलेशवाघ , पो हे का पंकज सुर्यवंशी , विकी वाघ , दादाभाई वाघ , प्रेमचंद जाधव करीत आहे .