DPT News Network धुळे: राजेंद्र बंब याने स्वतः व भावाच्या कागदपत्रांचा वापर करून शहरातील योगेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेत बनावट दस्ताऐवज तयार करून अवैध सावकार राजेंद्र बंब याने लॉकर उघडले. व दोघा भावांची एक लाख 70 हजारात फसवणूक केली. या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात राजेंद्र बंबविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंबच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
नासीर हुसेन शाह यांनी देवपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शहरातील योगेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेत बनावट दस्ताऐवज तयार करून अवैध सावकार राजेंद्र बंब याने मार्च 2018 पासून आतापर्यत नासीर हुसेन शाह व त्यांचा मोठा भाऊ जाकीर हुसेन शाह यांच्या नावावर लॉकर घेतले व या दोघा भावाच्या नावावर असलेल्या कागदपत्राव्दारे बनावट कागदपत्र तयार करून लॉकर हाताळले. या दोन्ही भावांची एक लाख 70 हजारात फसवणूक केली.
नासीर शाह यांच्या फिर्यादीवरून भादंवि 409,406,420,120 ब व विविध कलमा अन्वये राजेंद्र जीवनलाल बंब विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.